मुंबई : जेकब बेथेलच्या तडाखेबंद अर्धशतकाच्या जोरावर यजमान इंग्लंडने मालिकेतील दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात भारतीय संघावर चार विकेटनी मात केली. यासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
मालिकेतील पहिल्या सामन्यावर पावसाने पाणी फेरले होते. या सामन्यात वैभव सूर्यवंशी याने पदार्पण केले. वैभवने सर्वात बातमी पहिल्यांदा कोणाला दिली? जाणून घ्या. बीसीसीआयने व्हिडीओ शेअर केला आहे.
मला माझ्या डेब्यूबद्दल कळलं, तेव्हा मी सर्वात आधी माझ्या रूममध्ये जाऊन ही बातमी पप्पांना सांगितली. कारण ते माझ्यासोबत इथेच राहत आहेत. त्यांच्याशिवाय मी ही गोष्ट कुणाला सांगितली नव्हती. यानंतर मी मम्मीला आणि माझे कोच रोमी भिंडर सर यांना सांगितलं, जे नेहमी माझ्यासोबत असतात. पण सगळ्यात आधी पप्पांनाच सांगितलं. ही बातमी ऐकून पप्पा खूप खुश झाले आणि म्हणाले, "तू आतापर्यंत जसा खेळत आली आहेस तसाच खेळत रहा. कोणताही दबाव घेऊ नकोस आणि फक्त स्वतःच्या खेळावर विश्वास ठेव, असं वैभव सूर्यवंशी याने सांगितलं.
'ओल्ड ट्रॅफर्ड' वर ही लढत झाली. भारताने इंग्लंडसमोर १९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य इंग्लंडने १९व्या षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात पार केले. यात जेकब बेथेलने ब्रूकसोबत २४ चेंडूंत ५० धावांची, बँटनसोबत ५० चेंडूंत ६७धावांची भागीदारी रचली. तसेच, सॅम करनसोबत त्याने १६ चेंडूंत ४६ धावांची भागीदारी रचली. अखेरच्या चार षटकात इंग्लंडला ४९ धावांची आवश्यकता होती. मात्र, सतराव्या षटकात इंग्लंडने २९ धावांची लूट केली. बिश्णोईच्या या षटकात जेकबने तीन षटकार लगावले; तसेच एक चौकार मारला.
वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. जोफ्रा आर्चर आणि जोश टंग यांना षटकार लगावले. मात्र, पाचव्या षटकात विल जॅक्सच्या गोलंदाजीवर पुढे जाऊन मारण्याच्या प्रयत्नात तो यष्टीचीत झाला. मात्र, संथ सुरुवातीनंतर त्याने आणि अभिषेक शर्माने २९ चेंडूंत ५० धावांची सलामी दिली. पहिल्या दोन षटकांत दहाच धावा झाल्या होत्या. पॉवरप्लेमधील अखेरच्या चेंडूवर अभिषेकही परतला. त्यामुळे पहिल्या सहा षटकांअखेर भारताची २ बाद ६५ अशी स्थिती होती. त्यानंतर ईशान किशन, कर्णधार श्रेयस अय्यर, तिलक वर्मा यांनी दिलेल्या योगदानामुळे भारताने १९० धावा केल्या.
खेळ आकड्यांचा...
- ४ एकाही एकाही फलंदाजाने ५० हून अधिक धावा न करताही भारतीय संघाने चौथ्यांदा १९० धावांचा टप्पा गाठला. यापूर्वी, २०१९ मध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध (२०८ धावा), २०२२मध्ये विंडीजविरुद्ध (१९१) आणि २०१७मध्ये विंडीजविरुद्धच (१९० धावा) अशी कामगिरी केली होती.
- तिलक वर्माची जोफ्रा आर्चरविरुद्धची कामगिरी, २७३.१ तिलकने जोफ्राव्या २६ चेडूत २७३.१ च्या स्ट्राइक रेटने ७१ धावा केल्या आहेत. यात तीन चौकार आणि नऊ षटकारांचा समावेश. जोफ्राच्या गोलंदाजीवर तो एकदा बाद झाला आहे.

