Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Vaibhav Sooryavanshi: टीम इंडियाची कॅप घातल्यावर वैभवला अश्रू अनावर, बेबी बॉसच्या पदार्पणाचे हे क्षण देश कधीच विसरणार नाही

Vaibhav Sooryavanshi: टीम इंडियाची कॅप घातल्यावर वैभवला अश्रू अनावर, बेबी बॉसच्या पदार्पणाचे हे क्षण देश कधीच विसरणार नाही

​Vaibhav Sooryvanshi Debut News : 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियासाठी ऐतिहासिक पदार्पण केले. सचिन तेंडुलकरचा 37 वर्षांचा विक्रम मोडत तो भारताचा सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे.

वैभवचे पदार्पण झाले

मुंबई : अखेर तो ऐतिहासिक क्षण आला. आयपीएल 2026 गाजवल्यानंतर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळाली.


वैभव सर्वात तरुण खेळाडू

या पदार्पणासह वैभव भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. अवघ्या 15 वर्षे 99 दिवसांच्या वयात वैभवने टीम इंडियाची जर्सी परिधान केली.


सचिनचा रेकॉर्ड मोडला

याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर होता. सचिनने 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 16 वर्षे 205 दिवसांचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता तब्बल 37 वर्षांनंतर हा विक्रम वैभवच्या नावावर गेला आहे.


कॅप मिळताच वैभव झाला भावूक

सामन्यापूर्वी टीम इंडियाचा उपकर्णधार तिलक वर्माने वैभवला पदार्पणाची कॅप दिली. हा क्षण त्याच्यासाठी खूप खास होता.


वैभवचे भावूक क्षण व्हायरल

कॅप हातात घेताच वैभवच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्याचा भावूक क्षण सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.


आयपीएलमधून थेट टीम इंडियात

आयपीएल 2026 मध्ये वैभवने जबरदस्त फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्याची आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघात निवड झाली.


आयर्लंडमध्ये संधी हुकली होती

मात्र आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांत आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये त्याला संधी मिळाली नव्हती.


संजूच्या जागी संधी

संजू सॅमसनला सलग अपयश आल्यानंतर अखेर टीम मॅनेजमेंटने वैभववर विश्वास दाखवला आणि दुसऱ्या टी-20मध्ये त्याला पदार्पणाची संधी दिली.


वैभव सूर्यवंशी १४ धावा करून बाद झाला.

या सामन्यात भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी वैभवला सलामीवीर म्हणून पाठवले होते, अभिषेकसोबत सुरुवात करताना वैभव सूर्यवंशी १० चेंडू १४ धावांत बाद झाला. वैभवने आपल्या खेळीत दोन षटकार मारले.


भारताची प्लेइंग इलेव्हन

वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, रवी बिष्णोई, अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्ती.


Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims