म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्याहून हुबळीला निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या 'पॅन्टोग्राफ'मध्ये बिघाड झाल्यामुळे सोमवारी दुपारी नीरा रेल्वे स्थानकाच्या पुढे ही एक्स्प्रेस दोन तास जागेवरच उभी होती.
गेल्या आठवड्यातच पुणे रेल्वे स्थानकावर 'मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस'चा डबा रुळावरून घसरल्यानंतर पुण्यातून जाणाऱ्या वंदे भारतमध्ये पुन्हा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला.
प्रवाशांची गैरसोय
पुण्यातून थेट हुबळीला जाण्यासाठी या एक्स्प्रेस गाडीचा फायदा प्रवाशांना होत आहे. त्यामुळे तिकीट जास्त असले, तरी ही गाडी कायम फुल असते. सध्या उन्हाळा असल्यामुळे जास्तीत जास्त प्रवाशांनी वातानुकूलित गाड्यांना प्राधान्य देत आहेत. त्यामुळे वंदे भारतला चांगलीच गर्दी असते; परंतु सोमवारी 'पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस'मध्ये झालेल्या बिघाडामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप आला सामोरे जावे लागले.
अधिकाऱ्यांमार्फत चौकशी

