Strange and Weird Taxes in World: पाकिस्तानच्या 'Gobar Tax' ची सध्या जगभरात चर्चा होत आहे. एकीकडे विरोधी पक्ष याचा विरोध करत आहे, तर दुसरीकडे पंजाब राज्य सरकार ही विचित्र कर प्रणाली लागू करण्यावर ठाम आहे.
जगभरात लादल्या जाणाऱ्या या विचित्र करांबद्दल जाणून घेऊया.
Pakistan Gobar Tax Details: जगभरातील सरकारे आपली तिजोरी भरण्यासाठी जनतेवर विचित्र कर लादतात. अलीकडेच पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गाय आणि म्हशींच्या पालनावर टॅक्स आकारणीची योजना आखली जात आहे. डेली टाइम्सच्या वृत्तानुसार मरियम नवाज यांचे सरकार प्रत्येक गाय आणि म्हशीसाठी दररोज 30 पाकिस्तानी रुपये आकारण्याची योजना लागू करण्यावर ठाम आहे. 'स्वच्छ पंजाब' बायोगॅस कार्यक्रमाअंतर्गत सरकार हा उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले जात आहे.पाकिस्तानात आकारला जाणार शेण टॅक्स
पाकिस्तानात आकारला जाणार शेण टॅक्स" />डिसेंबर 2024 मध्ये पंजाब राज्यात हा उपक्रम सुरु केला होता ज्याचा उद्देश कचरा स्वच्छ करणे आणि त्यापासून बायोगॅस निर्मिती करून ऊर्जा निर्माण करण्याचा आहे. पाकिस्तानी विरोधी पक्षांनी या निर्णयावर टीका करत याला गोबर टॅक्स म्हटले. पण तुम्हाला माहित आहे का की जगभरातील इतरही देशांनी कोणकोणते विचित्र कर लादले आहे? जगभरात चर्चेत असलेल्या अशाच काही करांबद्दल जाणून घेऊया.
खिडकी कर
खिडकी कर" />नावाप्रमाणेच खिडक्यांवर कर आकारला जायचा. होय, ब्रिटनमध्ये घराला जितक्या जास्त खिडक्या असायच्या तितकाच जास्त कर भरावा लागायचा. श्रीमंतांना डोळ्यासमोर ठेवून हा इन्कम टॅक्स कायदा बनवला गेला होता, परिणामी कर चुकवण्यासाठी लोकांनी आपल्या खिडक्या विटांनी बंद केले गेले ज्यामुळे घरात प्रकाश आणि हवा खेळती राहण्यास अडचण निर्माण झाली, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवल्या.नंतर 1851 मध्ये हा इन्कम टॅक्स रद्द केला गेला, पण आजही काही जुन्या इमारतींमध्ये बंद खिडक्या आढळतील.
दाढीवरील कराची तरतूद
दाढीवरील कराची तरतूद" />रशियामध्ये सम्राट पीटर द ग्रेटने 1698 मध्ये युरोपीय फॅशन स्वीकारणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी वार्षिक 30 रुबल ते 100 रुबल इतका Beard Tax लागू केला होता. या अंतर्गत गरिबांना कमी, तर श्रीमंतांना जास्त कर भरावा लागायचा. तसेच कर भरल्याचे दाखवण्यासाठी एक टोकन जवळ बाळगयला लागायचे नंतर कॅथरीन द ग्रेटने 1772 मध्ये हा बीअर्ड कर काढून टाकला. (प्रातिनिधिक फोटो)
फार्ट टॅक्स
फार्ट टॅक्स" />पाकिस्तानमध्ये लागू केलेल्या कराप्रमाणेच हा कर जगातील सर्वात विचित्र करांपैकी आहे. डेन्मार्कमध्ये लोक याला गंमतीने Fart किंवा ढेकराचा कर म्हणतात. गाय, म्हैस, डुक्कर आणि मेंढी यांसारख्या प्राण्यांच्या ढेकर आणि पादण्यामधून बाहेर पडणाऱ्या मिथेन वायूवर हा कर लादला गेला असून हा कर 1 जानेवारी, 2030 रोजी लागू होणार आहे.
न्यूझीलंडमध्ये गायीच्या फुशारकीवर कर
न्यूझीलंडमध्ये गायीच्या फुशारकीवर कर" />न्यूझीलंडचा गायींच्या ढेकरांवरील टॅक्स सामान्यतः गायी आणि मेंढ्यांच्या ढेकरांमधून व वायू उत्सर्जनामधून बाहेर पडणाऱ्या मिथेन वायूवर लादण्याची योजना होती. डेन्मार्कच्या आधी शेतकऱ्यांवर मिथेन कर लावणारा न्यूझीलंड जगातील पहिला देश बनणार होता पण, नंतर विरोधामुळे हा कर नंतर रद्द केला गेला.
भोपळा खरेदीवरील कर
भोपळा खरेदीवरील कर" />अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये भोपळा खरेदीवर टॅक्स आकाराला जातो. काही राज्यांमध्ये खाण्यासाठी खरेदी केल्यास भोपळा करमुक्त असतो, पण हॅलोविनची सजावट किंवा जॅक-ओ'-लँटर्न बनवण्यासाठी खरेदी केल्यास त्यावर कर आकारला जातो.काही ठिकाणी खरेदीदार भोपळा खाणार आहे की सजवणार आहे, हे ठरवणे कठीण असते त्यामुळे, दुकानदारांना विचित्र नियमांचे पालन करावे लागते.

