Zain Khan : 'चेन कुली की मेन कुली' या सिनेमात झैन खाननं भूमिका साकारलेली. पण अभिनेता अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला. जाणून घ्या सध्या अभिनेता करतो तरी काय?
लोकप्रिय बालकलाकारानं सोडली इंडस्ट्रीइंडस्ट्रीमध्ये असे अनेक बालकलाकार होऊन गेले आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे.
पण, या ग्लॅमरच्या दुनियेत प्रत्येकजण टिकू शकत नाही. सुरुवातीच्या यशानंतर, अनेक बालकलाकारांनी अभिनय सोडून शिक्षण आणि सामान्य व्यावसायिक जीवन जगण्याचा मार्ग निवडला. या यादीतील एक नाव म्हणजे झैन खान. झैननं २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चैन कुली की मेन कुली' या चित्रपटातून स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
झैन खानचा सिनेमा

'चैन कुली की मेन कुली' मध्ये, झैन खाननं करण नावाच्या एका अनाथ मुलाची मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात राहुल बोसनंही मुख्य भूमिका साकारली होती. तर क्रिकेटमधील दिग्गज कपिल देव आणि नवज्योत सिंग सिद्धू यांनीही विशेष भूमिका केल्या होत्या. या चित्रपटामुळे झैन रातोरात प्रसिद्ध झाला.
अनेक सिनेमांमध्येही केलं काम

झैन खान फक्त एका चित्रपटापुरता मर्यादित राहिला नाही. 'चैन कुली की मेन कुली'च्या यशापूर्वी आणि नंतर, त्यानं इतर अनेक मोठे प्रोजेक्ट केले. प्रदीप सरकार यांच्या 'परिणीता'मध्ये त्यानं सैफ अली खानच्या बालपणीची भूमिका साकारली होती. तो शाहिद कपूरच्या 'चान्स पे डान्स' आणि सस्पेन्स ड्रामा 'माय वाइफ्स मर्डर' यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसला.
जाहिराती केल्या

झैननं जाहिरातीतही काम केलंय, पण जसजसं त्याचं वय वाढत गेलं, तसतसा तो अभिनयापासून दूर गेला.
झैन खाननं उरकलं लग्न

आज, झैन खान चित्रपटसृष्टी आणि सोशल मीडियाच्या प्रसिद्धीपासून पूर्णपणे दूर आहे. अभिनेत्याचं वय आता ३० असून त्यानं नुकतंच लग्न केलंय.
अभिनेता बनला यशस्वी व्यावसायिक

अभिनयक्षेत्र सोडल्यानंतर झैननं कॉर्पोरेट जगात प्रवेश केला आणि एक यशस्वी व्यावसायिक म्हणून स्वतःला सिद्ध केलं.
अनेक कंपन्यांमध्ये केलंय काम

झैननं पेटीएम, झोमॅटो आणि स्विगी यांसारख्या भारतातील आघाडीच्या टेक आणि स्टार्टअप कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.

