Dailyhunt
Zeenat Aman: 'अमिताभ यांच्यासोबत सीन करताना नाकी नऊ आले होते',  झीनत अमान यांनी सांगितला डॉन सिनेमातला BTS किस्सा

Zeenat Aman: 'अमिताभ यांच्यासोबत सीन करताना नाकी नऊ आले होते', झीनत अमान यांनी सांगितला डॉन सिनेमातला BTS किस्सा

मुंबई: गेल्या काही वर्षात गाजलेल्या सिनेमातल्या BTS अर्थात पडद्यामागे घडलेल्या गोष्टी चर्चेत येत आहे. एखादा सिनेमा शूट करत असताना पडद्यामागे बऱ्याच चांगल्या, वाईट, मजेशीर गोष्टीही अनेकदा घडत असताता.

आता अनेक जुने कलाकार त्यांच्या या सेटवरच्या काही आठवणी शेअर करताना दिसतात. आता बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी एक किस्सा सांगितलाय.

बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान सोशल मीडियावर कमालीच्या सक्रिय असतात. आपल्या अभिनय कारकिर्दीतील अनेक किस्से त्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी १९७८ मधील 'डॉन' या गाजलेल्या कल्ट क्लासिक चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची एक आठवण शेअर केली आहे. यात त्यांनी सांगितलं की, एका सीनमध्ये अमिताभ बच्चन यांना व्हीलचेअरवर बसवून ढकलणं त्यांच्यासाठी किती आव्हानात्मक होतं.

काय होता तो डॉन सिनेमातील तो सीन?

'डॉन' चित्रपटातील एका महत्त्वाच्या सीनमध्ये झीनत अमान (रोमा) एका नर्सचे रूप घेऊन बेशुद्ध असलेल्या अमिताभ बच्चन (डॉन) यांना हॉस्पिटलमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन बाहेर काढतात. ह सीन पडद्यावर पाहताना प्रेक्षकांना जितक थरारक आणि सहज वाटतो, तितकाच तो शूट करताना झीनत अमान यांच्यासाठी कठीण ठरला होता.



झीनत यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये या सीनचा बीटीएस अनुभव सांगितला. सिनेमात रोमा ही अत्यंत चाणाक्ष आणि धाडसी दाखवली आहे. पण खरं तर सेटवर तो सीन शूट करणं माझ्यासाठी नक्कीच सोप नव्हतं. ती जुन्या पद्धतीची व्हीलचेअर आणि त्यात अमिताभ बच्चन यांचं वजन! त्यांना ढकलणं माझ्यासाठी खूपच कठीण जात होतं. मला कॅमेऱ्यासमोर चेहऱ्यावर कोणतेही भाव न आणता शांत राहायचं होतं, पण प्रत्यक्षात मी माझी सर्व ताकद लावून ती व्हीलचेअर ढकलत होते. असं झीनत यांनी सांगितलं.





इतकच नाही तर, झीनत यांनी पुढं सांगितलं की, या चित्रपटाच्या टीमसोबत त्यांनी आधीही काम केलं असल्यानं त्या सेटवर खूप कम्फर्टेबल होत्या. त्यांना 'रोमा' हे पात्र साकारायला खूप आवडलं कारण ती एक स्वावलंबी आणि सशक्त स्त्री होती.
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr taims