Friday, 22 Jan, 7.21 pm Maharashtra update

Posts
आयुक्तांनी औरंगाबादकराना केले ‘हे’ भावनिक आवाहन

औरंगाबाद : कुठल्याही शहरात नवीन गोष्टीना सुरुवात झाल्यानंतर त्या गोष्टीना टिकवणे गरजेचे असते. मात्र अनेक वेळा तेथील नागरीकाकडूनच त्या गोष्टी नष्ट केल्या जातात. अशा वेळी नियमांनी बांधून ठेवण्याबरोबरच भावनिक आवाहन देखील तितकेच महत्वाचे असते. औरंगाबाद शहराच्या आयुक्तांनी सायकल ट्रॅकबाबत शहरवासियांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एक भावनिक आवाहन केले आहे. याचा परिणाम बेशिस्त नागरिकांवर कसा होतो हे मात्र पाहावे लागेल.

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) आणि महानगरपालिकेने क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान सायकल ट्रॅकची निर्मिती केली आहे. उद्घाटनास आठवडा होत नाही तोच तेथे अतिक्रमण झाले. याला रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने अतिक्रमण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला.

दरम्यान, सायकल ट्रॅकचे जतन करणे हे सर्व नागरीकांचे कर्तव्य आहे. हि बाब हेरून मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘मित्रांनो, येणाऱ्या पिढीला कळू द्या सायकलिंग ट्रॅक काय असते. तो प्रत्यक्षात कसा असतो हे कधीपर्यंत आपल्या मुलांना  यु ट्यूब वरील व्हिडीयो दाखवून सांगणार आहात.

एखाद्या देशाचा राष्ट्राध्यक्ष सायकलवर कार्यालयात जातो, हे केव्हापर्यंत दाखविणार. आपल्याकडे तयार करण्यात आलेले सायकल ट्रॅक प्रत्यक्षात आपल्या मुलांना दाखविण्यासाठी त्याचे जतन होणे गरजेचे आहे. सायकलिंग ट्रॅकची निर्मिती सर्वांच्या गरजेचा एक भाग होता. सर्वांच्या सहकार्यानेच तो बनविण्यात आला आहे. आता त्याचे जतन करणे सर्वांचे कर्तव्य आहे अशा शब्दात मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पोस्ट लिहिली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra update
Top