Sunday, 24 Jan, 9.02 am Maharashtra update

Posts
अजूनही हार्दिक दुःखातून सावरला नाही; वडिलांच्या आठवणीत झाला भावूक

मुंबई : कृणाल व हार्दिक पांड्या बंधुंवर मागील आठवड्यात दुखःचा डोंगर कोसळला. त्यांच्या वडिलांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाले.  वडिलांचे निधन झाल्याने पंड्या बंधू साहजिकच मनाने पूर्णपणे खचले आहेत. दरम्यान, हार्दिक पांड्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

यापूर्वी ही हार्दिक पंड्याने वडिलांच्या निधनानंतर एक दिवसाने ट्विटर आणि इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केली होती . ज्यामध्ये त्याने लिहिले होते ,’माझे वडील, माझे हिरो, तुम्हाला गमावले आहे. ही गोष्ट मान्य करणे, जीवनातील सर्वात अवघड गोष्टींपैकी एक आहे. परंतु तुम्ही आमच्यासाठी एवढ्या मोठ्या आठवणी सोडल्या आहेत की, आम्ही फक्त कल्पना करू शकतो की तुम्ही हसत आहात.’ .

हार्दिक पंड्याने पुढे लिहले होते , ‘तुमची मुले ज्या ठिकाणी उभी आहेत, ती तुमची मेहनत आणि आत्मविश्वासामुळे आहेत. तुम्ही नेहमी आनंदी होता. आता या घरात तुमच्या नसण्याने मनोरंजन कमी होणार. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि पुढे ही करत राहू. तुमचे नाव नेहमी टॉपवर राहील.

मला एक गोष्ट माहीत आहे, तुम्ही आम्हाला वरुन त्याचप्रकारे बघत आहात. ज्याप्रकारे तुम्ही इथे केले होते.’

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra update
Top