Sunday, 24 Jan, 9.32 am Maharashtra update

Posts
बातमी कामाची! राज्यात नोकरभरतीला सुरुवात; पाहा कोणत्या विभागात किती पदांसाठी भरती

मुंबई | अखेर राज्यात नोकरभरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. करोना आणि लॉकडाऊन दरम्यान अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. याचबरोबर करोना संकटाआधीही राज्यात अनेक नेतेमंडळींनी नोकर भरतीचा मुद्दा लावून धरला होता.

आता खर्या अर्थाने नोकरभरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकासआघाडी सरकारने राज्यात टप्प्याटप्प्याने नोकरभरती प्रक्रियेस सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती.

याचबरोबर शनिवारी खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही माध्यमांशी बोलताना याबाबतची माहिती दिली. राज्यातील या महाभरती प्रक्रियेअंतर्गत गृहविभागात ५ हजारहून अधिक जागांसाठी भरती होणार आहे. तर, या प्रक्रियेतील दुसऱ्या टप्प्यात ७ हजारहून अधिक पदांसाठी भरती होणार आहे.

भरती प्रक्रियेअंतर्गत गृहविभागात ५ हजार २९७ पदांसाठी, दुसऱ्या टप्प्यात ७ हजार २३१ पदांसाठी भरती होणार आहे. आरोग्य विभाग आणि गृह विभाग अशी तब्बल १३ हजार ८०० पदांची पहिल्या टप्प्यांत भरती होणार आहे. यामुळे आता ही बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी असणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra update
Top