Posts
काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अध्यक्षपदाबाबत झाला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अंतरिम पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच जूनपर्यंत पक्षप्रमुखपदी असतील, असं पक्षाच्या कार्यकारिणीने ठरवलं आहे. काँग्रेस पक्षाला त्यांचा पूर्णवेळ, नवा अध्यक्ष हा आता जून महिन्यातच मिळणार आहे अशी माहिती समोर येत आहे.
आज काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत या अंतर्गत निवडणुकीबाबत चर्चा झाली. त्यानंतर हे वेळापत्रक निश्चित करण्यात आलं आहे. एप्रिल मे दरम्यान प.बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पुदुच्चेरी या पाच राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यानंतरच नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे.
बैठकीत वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकूल वासनिक आणि पी चिदंबरम यांनी तात्काळ संस्थात्मक मतदान केलं जावं अशी मागणी केली. निवडणुकांमधील पराभवानंतर या नेत्यांनी पक्षनेतृत्व आणि व्यवस्थापनासंबंधी अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित केले होते, ज्यावरुन गदारोळ निर्माण झाला होता.