Friday, 22 Jan, 5.58 pm Maharashtra update

Posts
ममतादीदींच्या अडचणी वाढल्या,जेष्ठ मंत्र्याने दिला तडकाफडकी राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी व आमदरांनी भाजपात प्रवेश केलेला आहे. तर, डाव्या पक्षांनी काँग्रेसला सोबत घेत ममता बॅनर्जींविरोधात दंड थोपटले आहे. अशावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसमोर राज्यातील आपले वर्चस्व टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

बंगालमध्ये ममता यांच्या तृणमूलला गळती लागली असून, अनेक जण पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश करत आहे. अशातच ममता यांना आणखी एक धक्का बसला आहे. पश्चिम बंगालमधील वनमंत्री रजीब बॅनर्जी यांनी राजीनामा दिला आहे. रजीब बॅनर्जी यांनी राजीनाम्याचं कोणतंही कारण दिलेलं नाही.

राजीनामा देताना रजीब बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जींना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. रजीब बॅनर्जी यांनी पक्षातील काही नेते आपल्याविरोधात प्रचार करत असल्याची तक्रार देखील केली होती.

दरम्यान, नुकताच नदिया जिल्ह्यातील शांतीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी तृणमूलला रामराम ठोकत बुधवारी भाजपात पक्षप्रवेश केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra update
Top