Friday, 22 Jan, 7.08 pm Maharashtra update

Posts
मुख्यमंत्री आणि खासदारामध्ये खडाजंगी, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत मतभेदांना उत !

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षात निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार असलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक आज पार पडली आहे. काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी माध्यमांशी संवाद साधत, जून २०२१ मध्ये पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीबद्दल बैठकीत चर्चा झाली आहे. यावेळी पक्षातील मतभेद स्पष्टपणे समोर आले आहेत. काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबद्दल पक्षात दोन मतप्रवाह आहेत याची प्रचीती आली आहे.

वर्किंग कमिटीची बैठक काँग्रेसच्या अंतरिम पक्षाध्यक्ष सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. त्यात काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आनंद शर्मा आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आमनेसामने आले आहेत. आनंद शर्मा आणि अशोक गेहलोत यांच्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून वाकयुद्ध झाल्याचे पहायला मिळाले. येत्या जून महिन्यात काँग्रेसचा अध्यक्ष निवडला जाईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला असल्याची आहे.

‘तुम्ही दर ६ महिन्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मागणी करता. तुम्हाला पक्ष नेतृत्त्वावर विश्वास नाही का,’ असा सवाल गेहलोत यांनी शर्मांना विचारला होता. या वादात पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना मध्यस्थी करावी लागली. ‘दोन्ही नेत्यांनी जास्त भावुक होऊ नका,’ असं आवाहन करत सोनिया गांधी यांनी गेहलोत आणि शर्मा यांना शांत कराव लागल असल्याची माहिती समोर आली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra update
Top