Saturday, 14 Dec, 9.51 am महाराष्ट्र विश्व न्यूज

होम
'अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी उत्सव समिती' तर्फे १६ डिसेंबर रोजी अनुसूचित जाती-जमाती सलोखा परिषद

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) - 'सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी उत्सव समिती'तर्फे १६ डिसेंबर रोजी पुण्यात अनुसूचित जाती-जमाती सलोखा परिषद आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.बाबा आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या परिषदेत समताधिष्ठ समाजनिर्मितीसाठी कार्यरत १३ सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकल(यादवराव) सोनवणे हे या परिषदेचे अध्यक्ष असणार आहेत तर डॉ. शरद गायकवाड हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. ही परिषद क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह,महात्मा फुले पेठ, टिंबर मार्केट, पुणे येथे सोमवार,१६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी उत्सव समितीचे अध्यक्ष संजय आल्हाट यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

एम. डी. शेवाळे,वसंतराव साळवे,डॉ. विवेक क्षिरसागर,मिलींद गायकवाड,अॅड.विठ्ठल सोनवणे, रविंद्र माळवदकर,प्रा.प्रतिमा परदेशी,प्रल्हाद सोनवणे,राहुल पोकळे,दिलीप कुसाळे, अॅड. शैलजा मोळक, बी. बी. भोसले,कोमल रामदास गाडेकर सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव या परिषदेत करण्यात येणार आहे.

परिषदेच्या संयोजनासाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून त्यात रमेश राक्षे, विजय भुजबळ,आबा वाघमारे,लक्ष्मण तांबे,महादेव खंडागळे,बाबा भिसे,आकाश पवार,मंगेश पवार,सोपान खुडे यांचा समावेश आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Vishva News
Top