Saturday, 14 Dec, 9.57 am महाराष्ट्र विश्व न्यूज

होम
भुमराळा येथे जि.प.शाळेत गेल्या १० महीन्यापांसुन शिक्षकाचे पद रिक्त

गजानन कायंदे,(महाराष्ट्र विश्व न्यूज, लोणार बुलढाणा) - लोणार तालुक्यातील भुमराळा येथे गेल्या दहा महिन्यांपासून शिक्षकाचे पद रिक्त आहे.यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बाबतीत मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. भुमराळा येथे वर्ग १ते ७पर्यंत जिल्हा परिषदची शाळा असुन या शाळेत शिक्षिकांची ८ पदे मंजूर आहेत.

शाळेत गेल्या १० महीन्यापासुन दोन पदे आहेत.वार्षिक परीक्षा काही महीन्यांवर येऊन ठेपली आहे. मात्र शिक्षकांचे दोन पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावी अशी मागणी भुमराळा येथील शिक्षण समितीचे अध्यक्ष संतोष मुळे यांच्यास पालकांनी लोणार येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Vishva News
Top