Thursday, 12 Dec, 12.30 pm महाराष्ट्र विश्व न्यूज

होम
पैगंबर यांनी सांगितलेल्या मानवता धर्मावर परिसंवाद

महाराष्ट्र विश्व न्यूज,(पुणे) - 'सुफी वारकरी विचार मंच'च्या वतीने इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महमद पैगंबर यांनी सांगितलेल्या मानवता धर्मावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.

शुक्रवार दि. १३ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आझम कॅम्पस, कॅम्प, पुणे येथील डॉ. ए. आर. शेख असेंम्बली हॉलमध्ये हा परिसंवाद होईल.

हा कार्यक्रम एम.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून या परिसंवादासाठी अजमेर येथील गरीब नवाज यांच्या वंशातील हजरत सय्यद नसीरुद्दीन चिश्ती उपस्थित राहणार आहेत.

परिसंवादामध्ये विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड, पारनेर येथील डॉ. रफीक सय्यद, माजी आमदार उल्हास पवार व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण विचार मांडणार आहेत.

यावेळी अभिनव कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप, पिंपरी चिंचवडचे माजी महापौर तात्या कदम, ह.भ.प. मच्छींद्र महाराज लांडगे (चापडगांवकर) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक व सुफी वारकरी विचार मंचचे पदाधिकारी
मशकुर ए. शेख, उमर शरीफ मो. शेख, रईस चाँद शेख व नितिन गोरावडे यांनी दिली .

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra Vishva News
Top