Wednesday, 31 Oct, 10.58 am महाराष्ट्र

भंडारा
'हौसला और रास्ते' चित्रपटाला अवॉर्ड

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सातव्या दिल्ली आंतरराष्ट्रीय लघु-चित्रपट महोत्सवात 'हौसला और रास्ते' हा लघुचित्रपट दाखवला गेला. यासह जगभरातील जवळपास ५५ देशातील ३५० पेक्षा जास्त चित्रपट या चित्रपट महोत्सवात दाखवले गेले. आणि या महोत्सवात 'हौसला और रास्ते' 'महोत्सव विशेष लक्षवेधी लघुचित्रपट' म्हणून गौरविल्या गेला. शेतकरी आत्महत्या आणि त्यांच्या परिवाराच्या समस्या या ज्वलंत विषयावर हा लघुचित्रपट तयार करण्यात आला आहे.
या चित्रपटाचे निमार्ता चेतन भैरम आहेत. रोशन भोंडेकर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
सिनेमॅटोग्राफी तथा संगीत दिग्दर्शन प्रशांत चव्हाण (मुंबई) यांनी केले आहे. अक्षित रोहडा (गुजरात) यांनी सहाय्यक सिनेमेटोग्राफर म्हणून काम केले आहे.
प्रशांत वाघाये व योगेश भोंडेकर सहनिर्माता आहेत आणि इंस्ट्रक्टर इमरान शेख आहेत. गुजरातचे अभिनेते मौलिक चव्हाण, हिमांशी कावळे प्रमुख भुमीकेत आहेत तसेच संजय वनवे, अतुल भांडारकर, अंजली भांडारकर, सुरेश जोशी, सरोजलता बर्वे, स्वप्निल जांगळे, नीलेश हंबरडे यांच्या भूमिका देखील या चित्रपटात आहेत. भंडारा जिल्ह्यातील कलावंतानी या चित्रपटात अभिनय केल्याने त्यांचे जिल्हा पातळीवरही कौतुक केले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra
Top