कलश यात्रेने श्री हनुमान रामकथेला प्रारंभ !

Sunday, 01 Oct, 6.07 am

वाशिम : स्थानिक शुक्रवारपेठ भागातील माहूरवेस येथील ज्ञानगंगा परिसरात हनुमान मंदिर येथे श्री श्री रविशंकर यांची शिष्या देवी वैभवीश्रीजी यांच्या अमृतवाणीतून १ ते ४ आॅक्टोंबरदरम्यान श्री हनुमान रामकथेचे आयोजन केले आहे. यानिमित्त १ आॅक्टोंबर रोजी स्थानिक मध्यमेश्वर मंदिर येथून नगर परिषद मार्गे शुक्रवापेठ, माहुरवेश पर्यत १०८ कलशधारी महिलांची कलशयात्रा काढण्यात आली. यामध्ये महिला व पुरूषांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

सर्वप्रथम मध्यमेश्वर मंदिर येथे देवी वैभवश्रीजींनी पुजाअर्चना केली.