menu
महाराष्ट्रमुंबई

मुंबईची कूळकथा : मुंबईच्या उभारणीला अमेरिकेचे निमित्त!

14 February 2018, 5:01 am

खरे तर तसे प्रत्येक गाव आणि शहराचे त्याच्या भौगोलिकतेशी अनन्यसाधारण असे नाते असतेच. पण मुंबईच्या बाबतीत बोलायचे तर त्या नात्याची वीण इतर कोणत्याही शहरापेक्षा अधिक घट्ट आहे. महत्त्वाचे व्यापारी बंदर म्हणून असलेले मुंबईचे महत्त्व, आर्थिक राजधानीचे शहर म्हणून असलेला दिमाख, हा सारा मुंबईच्या भौगोलिकतेवर आणि भूशास्त्रीय रचनेवरच उभा आहे. एका वेगळ्या अर्थाने म्हणायचे तर इथल्या भूगोलाचा पाया या मुंबईला व्यंगार्थाने आणि वाच्यार्थानेही लाभलेला आहे.

साष्टी बेट म्हणजे मूळ मुंबईच्या (भाईंदर ते वांद्रे) परिसरात लाव्हाउत्सर्गातून उभ्या राहिलेल्या दोन डोंगररांगा ज्याप्रमाणे पाहायला मिळतात तशा पर्वतरांगा नव्हे पण अनेक डोंगर आपल्याला आजच्या मध्य आणि दक्षिण मुंबईत पाहायला मिळतात.

Loading...

No Internet connection

Link Copied