Monday, 20 Jan, 6.56 am महाराष्ट्र

महाराष्ट्र
पळा पळा कोण पुढे पळे तो! गेट. सेट. गो!

  • tags

आशियातील सर्वात मोठी आणि मानाचा 'गोल्डन लेबल' दर्जा मिळालेली मुंबई मॅरेथॉन रविवारी प्रचंड उत्साहात आणि स्पर्धकांच्या तुडुंब गर्दीत पार पडली. एरव्ही मुंबईकर पोटापाण्यासाठी दिवसभर धावतच असतात. रविवारी कडाक्याच्या थंडीला न जुमानता हजारो मुंबईकर या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. देश-विदेशातील नामांकित धावपटूंचा सहभाग हे या स्पर्धेचे वैशिष्टय़ मानले जाते. या स्पर्धेवर इथिओपियाच्या धावपटूंचाच वरचष्मा राहिला. डेअरा हरिसाने 2.08.09 अशा विक्रमी वेळेसह प्रथम क्रमांक पटकावला. पुरुष गटात पहिल्या तिन्ही स्थानांवर तर महिला गटात पहिले व तिसरे स्थान इथिओपियन खेळाडूंनीच पटकावले.

महिला हाफ मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. कोल्हापूरची आरती पाटील हिने पहिल्याच प्रयत्नात दुसऱया स्थानावर झेप घेतली, तर नाशिकच्या मोनिका आथरे हिने तिसरे स्थान पटकावताना सहाव्यांदा या स्पर्धेत अव्वल तीनमध्ये येण्यात यश संपादन केले. फुल मॅरेथॉनमध्ये परभणीच्या ज्योती गवाते हिने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'ड्रिम रन'ला गन शॉटद्वारे हिरवा झेंडा दाखविला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक मंत्रीमहोदय तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपली प्रतिक्रिया द्या
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra
Top