Monday, 10 Feb, 8.56 pm महाराष्ट्र

महाराष्ट्र
शिर्डी बाह्यवळण रस्त्याची दूरवस्था; सहा तास 'रास्ता रोको' आंदोलन

  • tags

शिर्डी बाह्यवळण रस्त्यावर पिंप्री निर्मळ येथे ग्रामस्थांनी सहा तास 'रास्ता रोको' आंदोलन केले. शिर्डी ते निर्मळप्रिंपी बायपासची दूरवस्था झाली असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आणि उडणारी धूळ यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत बायपास रस्ता सहा तास अडवत 'रास्ता रोको' आंदोलन केले. ट्रक चालकांनीही आंदोलनास पाठींबा दिला. सुमारे सहा तास आंदोलन सुरू असल्याने या रस्त्यावरील जड ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हांला अटक करा अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे काही वेळ तणावही निर्माण झाला होता. आंदोलनस्थळी राहत्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी भेट देत आंदोलकांची समजूत काढली. तसेच रस्त्याच्या कामात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

वर्षभरापासून शिर्डी बाह्यवळण रस्ता तसेच नगर मनमाड रस्त्याची दूरवस्था झाली आहे. शिर्डी तीर्थस्थळाची वाहतूक कोंडी रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाने अवजड वाहतूक बाह्यवळण रस्त्यामार्गे वळवली होती. आधीच निकृष्ठ रस्ता आणि त्यात अवजड वाहतूक वळवल्याने रस्त्याची चाळण झाली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालवणे कठीण झाले. तसेच उडणाऱ्या धुळीमुळे शेती, फळबांगांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्याची दूरवस्था झाली असतानाही सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीने एकवर्ष कोट्यवधीचा टोल या रस्तावर वसूल केला. कोर्टाने रस्त्याची दूरवस्था पाहता कंपनीची टोल वसुली बंद करत कंपनीच्या जमा रकमेतुन सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन महिन्यात रस्ता दुरुस्त करावा असे निर्देश दिले होते. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग ढिम्म असल्याने वाहतुकदार आणि परिसरात असलेल्या नागरिकांची समस्या सुटलेली नाही. भूसंपादनात जमिनी दिल्याने विकास होईल अशी आशा बाळगलेल्या ग्रामस्थांच्या पदरी निराशा आल्याने त्यांच्यामध्ये तीव्र असंतोष आहे.

आपली प्रतिक्रिया द्या
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Maharashtra
Top