Tuesday, 26 Jan, 4.58 pm महाराष्ट्रनामा

देश
हिंसा घडवणं पूर्वनियोजित कट? | हे होते अधिकृत मार्ग | मग एक गट ITO मार्गे का घुसला?

नवी दिल्ली, २६ जानेवारी: नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. आयटीओ येथे शेतकऱ्यांनी पोलिसांची व्हॅन, क्रेन ताब्यात घेतली आहे. त्यामुळे पोलीस या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करत आहे. शेतकरी आंदोलन अधिकच चिघळल्याने दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. शेतकरी लाल किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवल्याने संपूर्ण दिल्लीला छावणीचं स्वरुप आलं आहे.

वास्तविक सिंधु बॉर्डरवरून ही रॅली निघणार होती. मात्र, या मार्गाने न जाता शेतकरी आयटीओपर्यंत पोहोचले. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री उडाली. त्यातच दगडफेक सुरू झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. याचवेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यास सुरुवात केली.

दरम्यान, भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, "आमचं आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरु आहे. आंदोलनाच्या ठिकाणी कोणताही गोंधळ झालेला नाही. आम्ही सध्या गाजीपूर येथे आहोत आणि येथील वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरु आहे." सर्वांना प्रश्न पडला आहे की, शेतकरी राजधानीत पोहोचले कसे? कारण शेतकरी युनियनच्या नेत्यांनी शहरात प्रवेश न करण्याचे आश्वासन यापूर्वीच दिलं आहे. किसान एकता मोर्चाने ट्विट करुन हिंसा निर्माण करणं हा सरकारचा पूर्वनियोजित कट असल्याचा दावा केला आहे. शेतकरी नेत्यांनी दावा केला आहे की, "मोर्चाचा जो रुट (मार्ग) होता, त्याबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोहचली नसावी, काही शेतकऱ्यांमध्ये मोर्चाच्या मार्गाबाबत थोडा गोंधळ निर्माण झाला होता. मात्र त्या ठिकाणी झालेल्या हिंसेमागं सरकारचं मोठं राजकारण आहे.

विशेष म्हणजे किसान एकता मोर्च्याच्या अधिकृत फेसबुक आणि ट्विटर पेजवरून ट्रॅक्टर रॅलीच्या सर्व मार्गांची माहिती आधीच प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र केवळ आयटीओ मार्गाने काही शेतकरी आत घुसले आणि नेमका त्याच मार्गावर हिंसक प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतं आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत मार्गापेक्षा माध्यमांचे प्रतिनिधी आयटीओ मार्गावर मोठ्या संख्येने हजर कसे काय होते याबद्दलही शंका उपस्थित होऊ लागली आहे. कारण पोलिसांनी अधिकृत मान्यता मिळालेल्या सर्व मार्गांवर अजूनही शांततेने ट्रॅक्टर रॅली सुरु आहेत. मात्र आयटीओ मार्ग त्याला अपवाद ठरल्याने अनेक शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.

26 ਜਨਵਰੀ ਨੂੰ
ਟਰੈਕਟਰ ਰੈਲੀ
ਦਾ ਹਿੱਸਾ ਬਣੋ

ਹਿੱਸਾ ਲੈਣ ਵਾਲੇ ਸਾਰੇ 8448385556 ਨੰਬਰ 'ਤੇ ਮਿਸਡ ਕਾਲ ਦਿਓ ਅਤੇ ਰਜਿਸਟਰ ਕਰਾਓ ਤਾਂ ਜੋ.

Posted by Kisan Ekta Morcha on Monday, January 25, 2021

26 ਜਨਵਰੀ ਨੂੰ
ਟਰੈਕਟਰ ਰੈਲੀ
ਦਾ ਹਿੱਸਾ ਬਣੋ

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MaharashtraNama
Top