Thursday, 06 May, 4.55 pm महाराष्ट्रनामा

देश
प. बंगाल | भाजप IT सेलचा पराक्रम | टीएमसीच्या बदनामीसाठी हिंसाचारात मृत कार्यकर्ता म्हणून पत्रकाराचा फोटो वापरला

कोलकत्ता, ०६ मे : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर हिंसाचार उफाळला आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. या हिंसाचारात कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षानं केला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगाल युनिटनं समाज माध्यमांवर एक व्हिडिओ पोस्ट टाकली आहे. त्या व्हिडिओत चुकीचा फोटो वापरल्याने मोठी नाचक्की झाली आहे. भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता माणिक मोईत्रा याच्याऐवजी इंडिया टुडेचा पत्रकार अभ्रो बॅनर्जी याचा फोटो लावला होता.

या व्हिडीओत असा दावा करण्यात आला आहे की, माणिक मोइत्रा नावाच्या एका व्यक्तीला सीतलकूची येथे मारण्यात आलं आहे. पण भाजपाने या व्हिडीओत ज्या व्यक्तीचा फोटो वापरला आहे तो एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनेलचा पत्रकार अभ्रो बनर्जी यांचा आहे. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर भाजपाने ९ लोकांच्या नावाची यादी जारी केली आहे. ज्यात मोमिक मोइत्रा, मिंटू बर्मन यांच्या नावाचा समावेश आहे. परंतु माणिक मोइत्रा नावाने कोणाची ओळख पटली नाही.

पत्रकार अभ्रो बॅनर्जी यांना अनेक फोन आल्यानंतर त्यांना ही बाब लक्षात आली. त्यांना सर्वप्रथम काय झालं हे समजलंच नाही. त्यानंतर भाजपाच्या आयटी सेलने व्हिडिओत त्यांचा फोटो लावल्याचं लक्षात आलं. ५ मिनिटं २८ सेकंदाचा व्हिडिओ बुधवारी अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ १२ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला होता. या व्हिडिओनंतर मनस्ताप झाल्याने अभ्रो बॅनर्जी यांनी ट्वीट करुन जिवंत असल्याचं सांगितलं.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: MaharashtraNama
Top