Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मंत्री पंकजा मुंडे यांनी 'जागतिक पर्यावरण दिना'च्या पर्यावरणपूरक वस्तू भेट देऊन दिल्या  मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ सदस्यांना शुभेच्छा

मंत्री पंकजा मुंडे यांनी 'जागतिक पर्यावरण दिना'च्या पर्यावरणपूरक वस्तू भेट देऊन दिल्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळ सदस्यांना शुभेच्छा

मुंबई, दि. २ : जागतिक पर्यावरण दिन, ५ जून च्या पार्श्वभूमीवर पर्यावरण व वातारवणीय विभागाच्या वतीने रोजच्या वापरातील पर्यावरणपूरक वस्तूंचे किट तयार करण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी हे किट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्यांना भेट देऊन जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढविण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत पर्यावरणपूरक डायरी, पाण्याची बॉटल, किचेन, चिनी मातीचे कप, व्हिजिटिंग कार्ड होल्डर, पेपर होल्डर आदींचा समावेश असलेल्या वस्तूंचे किट तयार केले आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे स्वागत करून जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

0000

नंदकुमार वाघमारे/विसंअ

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr shasan