Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राज्यातील प्रत्येक महिला शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे - राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

राज्यातील प्रत्येक महिला शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे - राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर

त्रपती संभाजीनगर, विमाका ,दि. ३०: निरोगी कुटुंब, निरोगी समाजासाठी मुख्य घटक असलेल्या महिला या आरोग्यदृष्ट्या निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांना मासिकपाळी, रजोनिवृत्ती आणि पीसीओडी सारख्या समस्येशी कायम सामना करावा लागतो.

महिलांमध्ये याबाबत योग्य उपचार आणि समुपदेशन होणे गरजेचे असल्याने, रजोनिवृत्ती आणि पीसीओडी तपासणीसाठी जिल्हा जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र क्लिनिक सुरू करण्यात आले. या क्लिनिकच्या माध्यमातून जवळपास सव्वा लाखावर महिलांनी लाभ घेतला असून राज्यातील प्रत्येक मुलगी, महिला शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे, असे मत राज्यमंत्री मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी आज येथे व्यक्त केले.

महात्मा गांधी मिशन (एम.जी.एम.) वैद्यकीय महाविद्यालयाच्या द्योतसन हॉल येथे राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते महिलांच्या आरोग्याशी संबंधित रजोनिवृत्ती (Menopause) आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOD/PCOS) विषयक राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

या प्रसंगी आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक डॉ. आशीष भारती, डॉ. कांचन वानोरे, डॉ. आशिष भारती, डॉ. दयानंद मोतीपवळे, डॉ . रेखा भंडारे,डॉ. प्रशांत हिंगणकर (युनिसेफ), डॉ. मंगेश गढरी (युनिसेफ), डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. संतोष कडले, डॉ. सुरेश रावते, डॉ. विनायक खेडकर, डॉ. अभय धानोरकर, डॉ कमलाकर मुदखेडकर, डॉ.पद्मजा सराफ, डॉ राहुल चव्हाण,डॉ पल्लवी पघडाल, डॉ. ज्ञानोबा भोसले,यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, तज्ज्ञ आणि मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्य उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत मराठवाडा विभागातील स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या की, बदलत्या जीवन शैलीनुसार आपल्या आरोग्याच्याबाबतीत जागृत होणे आवश्यक आहे. तसेच रजोनिवृत्ती आणि पी सी ओ डी तपासणीसाठी क्लिनिकचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्यासाठी आरोग्यसेवा अधिक सक्षम व परिणामकारक करण्यासाठी विशेषतः महिलांच्या आरोग्यविषयक सेवांची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आणि रजोनिवृत्ती तसेच पीसीओडीग्रस्त महिलांना दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी आजची ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यशाळेत रजोनिवृत्ती व्यवस्थापन, पीसीओडीचे निदान व उपचार, समुपदेशन, आरोग्यदायी जीवनशैली, मानसिक व शारीरिक आरोग्य, आधुनिक उपचारपद्धती आदी विषयांवर चर्चासत्र आणि प्रश्नोत्तर सत्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ज्ञान व कौशल्यात भर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढता ताण यामुळे पीसीओएसचे प्रमाण वाढत असून वेळेत निदान, योग्य समुपदेशन आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब केल्यास हा विकार प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येऊ शकतो,असे तज्ज्ञांनी यावेळी सांगितले.

******

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: maharashtr shasan