Saturday, 23 Jan, 2.36 pm माझा पेपर

होम
१५ मेसेजिंग अ‍ॅप्सना या ऑल इन वन अ‍ॅपने एकाच ठिकाणी करता येणार मॅनेज

नवी दिल्ली - सध्याच्या घडीला आपल्यापैकी बहुतेक जण किंमान दोन तीन मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर करतच असेल यात काही शंका नाही. पण दरवेळेस वेगवेगळ्या अॅप्सवर येणारे मेसेज जाऊन वाचणे आपल्यापैकी अनेकांना शक्य होत नाही.

पण आता यावर देखील तोडगा निघाला आहे. कारण यासाठी आता एक भन्नाट अ‍ॅप तुमच्या सेवेत दाखल झाले असल्यामुळे प्रत्येक वेळी वेगवेगळी अ‍ॅप्स ओपन करून त्यात जाऊन मेसेजेस वाचण्याची तुम्हाला गरजच भासणार नाही. तुम्हाला या अ‍ॅप्सच्या मदतीने १५ पेक्षा अधिक मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स एकाच ठिकाणी ठेवता येणार आहेत.

Beeper is on Twitter of course @onbeeper https://t.co/l3YlJ0oj2y

- Eric Migicovsky (@ericmigi)


या नव्या अ‍ॅपचे नाव 'बीपर' असे असून तुम्ही या अॅपच्या माध्यमातून अनेक अ‍ॅपमधील मसेज या एकाचवेळी वाचू शकता. युझरला या अ‍ॅपच्या मदतीने १५ मेसेजिंग प्लॅटफॉर्म्स एकाच ठिकाणी मॅनेज करण्याची सुविधा मिळणार आहे. सेंट्रल हब प्रमाणे हे अ‍ॅप काम करते. फेसबुक मेसेंजर, सिग्नल, ट्विटर, टेलीग्राम, व्हॉट्सअ‍ॅप सारख्या अ‍ॅप्सचा यामध्ये लाभ घेता येईल. याव्यतिरिक्त या अ‍ॅपची विशेष म्हणजे आयमेसेजचाही वापर बीपरमध्ये करता येऊ शकतो.

याव्यतिरिक्त हे अ‍ॅप अँड्रॉईड, विंडोज आणि लिनक्सवर काम करते. त्याचबरोबर हे अ‍ॅप युझर्सना मोफत मिळणार नाही. या अॅपचा वापर करण्यासाठी युझरला दर महिन्याला १० डॉलर्स म्हणजेच जवळपास ७५० रूपये मोजावे लागणार आहेत. याच्या माध्यमातून युझर्सना सर्वच अ‍ॅप्स एकाच प्लॅटफॉर्मवर वापरता येतील. यावर गुगल हँगआऊट, आयमेसेज, इन्स्टाग्राम, आयआरसी. मॅट्रिक्स, फेसबुक मेसेंजर. सिग्नल, स्काईप, व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, ट्विटर, स्लॅक अशा अनेक अ‍ॅप्सचा सपोर्ट आहे. हे अ‍ॅप यापूर्वी NovaChat या नावाने ओळखले जात होते आणि हे अ‍ॅप Eric Migicovsky यांनी विकसित केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top