Saturday, 18 Sep, 7.12 pm माझा पेपर

होम
आता 4 डिव्हाइसेसवरून वापरता येणार एकच WhatsApp अकाऊंट

लवकरच एका अपडेटच्या माध्यमातून आपल्या नॉन बीटा युजर्ससाठी WhatsApp मल्टी-डिव्हाइस फिचर सादर करणार आहे. नॉन बीटा युजर्स देखील या अपडेटच्या माध्यमातून मल्टी-डिव्हाइसच्या बीटा प्रोग्रॅममध्ये सहभागी होऊ शकतात, अशी माहिती WABetainfo ने दिली आहे. युजर्स नवीन फिचरचा वापर करून मूळ डिव्हाइस व्यतिरिक्त एका अकाऊंटशी चार डिव्हाइस कनेक्ट करू शकतात. परंतु कनेक्ट केलेले इतर डिव्हाइस फोन असू शकत नाहीत.

सर्व युजर्सना मल्टी-डिव्हाइस फिचर वापरण्याची संधी लोकप्रिय मेसेंजरच्या 2.21.19.9 अपडेटमधून मिळेल. अँड्रॉइड तसेच आयओएसवर देखील हे अपडेट उपलब्ध होईल. भविष्यात अजून अपडेट मिळवायचे असतील, तर युजर्सना मल्टी-डिव्हाइस व्हर्जनवर व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करावे लागेल.

कंपनीने जूनमध्ये या फिचरची घोषणा केली होती. या फिचरच्या मदतीने फोन सोडून पीसी, मॅक आणि टॅबलेट आपल्या मुख्य व्हॉट्सअ‍ॅप अकाउंटशी कनेक्ट करू शकतील. असे केल्यांनतर मूळ डिव्हाइसमध्ये इंटरनेट कनेक्शन नसले किंवा फोन बंद असला तरी कनेक्टड डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता येईल.

व्हॉट्सअ‍ॅपचे Multi-device फिचर वापरण्यासाठी

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top