Thursday, 13 Apr, 3.12 am माझा पेपर

होम
आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरी होणार बाबासाहेबांची जयंती


मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा दिवस या वर्षीपासून 'ज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोलेंनी केली असून यासोबतच, इतरही काही महत्त्वाच्या घोषणा त्यांनी केल्या आहेत.

देशभरात मोठ्या उत्साहात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते. मात्र, राज्य सरकारने आता 'ज्ञान दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असून समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोलेंनी इतरही काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. डॉ. आंबेडकर यांची आठवण असलेली ५० स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. राज्यातील बुद्ध लेण्या आणि बाबासाहेबांच्या स्फूर्तिस्थळांचा पर्यटन कॅरिडॉर म्हणून विकास केला जाणार आहे. त्यासाठी निधीही मंजूर झाला असल्याचे बडोलेंनी सांगितले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top