Monday, 27 Jan, 10.04 am माझा पेपर

होम
अदनान सामीच्या 'पद्मश्री'ला मनसेचा तीव्र विरोध

मुंबई - प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या 'पद्मश्री' पुरस्काराची प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला घोषणा झाली. कलाक्षेत्रातील बऱ्याच कलाकारांना यामध्ये 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये सुरेश वाडकर, कंगना राणावत, अदनान सामी, एकता कपूर आणि करण जोहर यांचा समावेश आहे. सध्या या कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण पद्मश्री पुरस्कार मूळ भारतीय नसलेल्या अदनान सामीला जाहीर झाल्यामुळे मनसेकडून विरोध करण्यात आला आहे.


ट्विटच्या माध्यमातून अदनान सामीला जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आपला निषेध नोंदवला आहे. त्याला २०१५ मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात भारतीय नागरिकत्व मिळाले आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल करण्यात येत आहे. त्याला एवढे लिफ्ट करण्याचे कारण काय?', असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

भारत सरकारने मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला कोणताही पुरस्कार देऊ नये, हे मनसेच ठाम मत असल्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा ही मनसेची मागणी असल्याचेही त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top