Friday, 01 Nov, 2.12 pm माझा पेपर

होम
अजय गोगावलेने गायले सई ताम्हणकरसाठी हे गाणे

सई ताम्हणकरचा आगामी चित्रपट 'कुलकर्णी चौकातला देशपांडे'चे पहिले पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आल्यानंतर चित्रपटाबद्दल कुतूहल निर्माण होत असतानाच चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा भेटीला आला होता. मध्यमवर्गीय बंडखोर बाईची एक बंडखोर गोष्ट असलेला कुलकर्णी चौकातला देशपांडे चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाच्या कथेचा अंदाज दिला. स्त्री आणि बायको यामध्ये अडकलेल्या आईच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक घडामोडींची झलक ट्रेलरमधून प्रेक्षकांना मिळाली. आता या उत्सुकतेला अधिक ताणून धरण्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचे पहिले-वहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे.

गजेंद्र अहिरे यांनी सई ताम्हणकर, निखिल रत्नपारखी आणि राजेश श्रृंगारपुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तरुणी, आई आणि बायको म्हणून भूमिका साकारताना, प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय देताना स्त्रीला तडजोड ही कधी ना कधी करावीच लागते. कधी स्वत:च्या अस्तित्वासाठी तर कधी नात्यांसाठी ही तडजोड असते. आयुष्य म्हटले की नात्यांचा सहवास, त्यांचा गुंता, नात्यात होणा-या विचारांची देवाण-घेवाण या आपसूक आल्याच पण या सर्व प्रसंगाना अगदी धैर्याने सामोरी जाते, ती चित्रपटाची नायिका म्हणजेच सई ताम्हणकर.

स्मिता गानू यांनी स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर सहनिर्मिती अजित माधवराव पोतदार आणि सीमा निरंजन अल्पे यांनी केली आहे. येत्या २२ नोव्हेंबरला 'कुलकर्णी चौकातला देशपांडे' संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>