Monday, 14 Oct, 5.28 am माझा पेपर

होम
भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांच्यासह तिघांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

मुंबई - अर्थशास्त्रातील प्रतिष्ठेचा नोबेल पुरस्कार भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्यासह एस्थर डफ्लो आणि मायकल क्रेमर यांना जाहीर झाला आहे. या तिघांनी जागतिक गरिबी दूर करण्यासाठी केलेल्या संशोधनाच्या पार्श्वभूमीवर हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.

१९६१ साली कोलकत्यात ५८ वर्षांच्या अभिजित बॅनर्जी यांचा जन्म झाला होता. कलकत्ता विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी १९८८ मध्ये हार्वर्डमधून पीएच डी केली होती. नोबेल समितीने म्हटले आहे की, या तिघांनी जागतिक गरिबी दूर करण्यासाठी केलेले संशोधन निश्चितच उपयुक्त ठरले आहे. विकासशील अर्थशास्त्राचे प्रारूप दोन दशकांच्या कालावधीत त्यांच्या प्रयोगशील वृत्तीमुळे बदलले असल्यामुळे या क्षेत्रात संशोधनाला आणखी वाव निर्माण झाला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>