Sunday, 17 Nov, 10.28 am माझा पेपर

होम
'चुपके चुपके'च्या रिमेकमध्ये हा अभिनेता साकारणार प्रमुख भूमिका

1975 मध्ये आलेला लोकप्रिय चित्रपट 'चुपके चुपके' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूषण कुमार यांनी ओरिजनल चित्रपटाचे राइट्स विकत घेतले आहेत. खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या रिमेकमध्ये धर्मेंद्र यांची भूमिका अभिनेता राजकुमार राव साकेरणार आहे.

चुपके-चुपकेमध्ये धर्मेंद्र यांच्या डॉ. परिमल त्रिपाठी ही भूमिका साकारणारा राजकुमार राव म्हणाला की, ही एक मोठी जबाबदारी आहे. सध्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे.

याआधी चित्रपटाचे राइट्स मनीष गोस्वामी यांनी घेतले होते. मात्र भूषण कूमार हे राइट्स मिळविण्यात यशस्वी ठरले. याविषयी मनीष म्हणाले की, आम्ही सर्व इंडस्ट्रीमधील सहकारी आहोत आणि गरजेच्या वेळी एकमेकांच्या मदतीला येतो.

काही दिवसांपुर्वी राजकुमार रावचा 'मेड इन चायना' चित्रपट रिलीज झाला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. सध्या राजकुमार हॉरर कॉमेडी चित्रपट 'रूही अफ्जा'च्या चित्रिकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर देखील प्रमूख भूमिकेत असतील.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>