Thursday, 03 Oct, 11.20 am माझा पेपर

होम
हृतिक-टायगरच्या 'वॉर'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रचला इतिहास

२ ऑक्टोंबरला बॉलिवूडचे दोन हँडसम हंक हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा 'वॉर' चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला. पहिल्यांदाच हे दोन अ‌ॅक्शन हिरो एकत्र पडद्यावर झळकणार असल्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद लाभला. चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी गर्दी केल्यामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करत इतिहास रचला आहे.

या चित्रपटाच्या कमाईचे आकडे सोशल मीडियावर चित्रपट समीक्षक कोमल नाहटा यांनी शेअर केले आहेत. ५० कोटींपेक्षा जास्त कमाई पहिल्याच दिवशी चित्रपटाने केली आहे. हा चित्रपट हृतिक आणि टायगर दोघांच्याही करिअरमधील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. तसेच यावर्षीचाही हा बिगेस्ट ओपनर ठरला आहे. 'वॉर'च्या पूर्वी सलमान खानच्या 'भारत' चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई सर्वाधिक होती. मात्र, 'वॉर'ने या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडत पहिल्याच दिवशी अर्धशतकापेक्षा जास्त कमाई केली आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून हृतिक आणि टायगरच्या 'वॉर'ची चर्चा सुरू होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यावर प्री - बुकिंगमध्येच या चित्रपटाने ३१ ते ३२ कोटींची कमाई केली होती. याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, तब्बल ३८०० स्क्रिन्सवर 'वॉर' चित्रपट झळकला आहे. या चित्रपटात थरारक अ‌ॅक्शन्स आणि हृतिक - टायगरची जुगलबंदी पाहायला मिळते. त्यामुळे हा चित्रपट आणखी कोणते विक्रम रचतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top