Saturday, 28 Mar, 5.44 pm माझा पेपर

होम
ईराणमध्ये एका अफवेने घेतला शेकडो लोकांचा जीव

तेहरान : सध्या साऱ्या जगाचे कंबरडे कोरोनाने मो़डले आहे. इटली आणि इराणमध्ये चीनच्या वुहानपासून आलेल्या या व्हायरसने थैमान घातले असून इराणमधील मृतांच्या संख्येत अचानक वाढ झाली. आरोग्य सेवांच्या अभावामुळे आणि कोरोनाबद्दल असलेल्या कमी माहितीमुळे यापूर्वीच 2 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पण इराणमध्ये आता कोरोनामुळे नव्हे तर एका अफवेमुळे शेकडो लोकांचा जीव घेतला.

इराणच्या तेहरानमध्ये एकाने कोरोनाचा नाश विष पिऊन होतो, अशी अफवा पसरवली. त्यामुळे 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर, एक हजाराहून अधिक लोकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इराणी आरोग्य सेवेला जनतेने कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी दारू पिण्यावर बंदी घालण्याचे आवाहन केले होते. तर, काही लोकांनी मिथेनॉल पिण्यामुळे कोरोनाविरूद्ध लढायला मदत होते, अशी अफवा पसरवली होती. यानंतर शेकडो लोकांनी हे विष प्यायले. यासंदर्भातील वृत्त इराणमधील प्रसार माध्यमांनी दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार मिथेनॉलच्या वापरामुळे सुमारे 300 लोक मरण पावले आहेत आणि 1000 हून अधिक गंभीर आजारी झाले आहेत.

दुसरीकडे इराणमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या 29 हजार घटनांची नोंद झाली आहे, तर 2,200 हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मत आहे की संसदीय निवडणूकीपूर्वी इराण मृत्यूची संख्या लपवत आहे. इराणमधीव सोशल मीडियावर बनावट उपाय वेगाने पसरत आहेत. देशभर हा व्हायरस पसरण्यापूर्वी सरकारने बरीच पावले उचलली. ओस्लो येथील क्लिनिकल विषारी तज्ञ डॉक्टर एरिक होवडा म्हणाले की, व्हायरस पसरत आहे आणि लोक मरत आहेत. पण अशा अफवांमुळे लोकांचा जीव जाणे वाईट आहे. इराणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापेक्षा अशा अफवांमुळे जास्त लोकांचा जीव जाऊ शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top