Thursday, 17 Oct, 6.36 am माझा पेपर

होम
जाणून घ्या अयोध्या प्रकरणी निकाल देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांविषयी

अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशीद वादावरील सुनावणी संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने 40 वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याची सुनावणी पूर्ण केली आहे. बुधवारी सुनावणी संपल्यानंतर या प्रकरणात स्थापन झालेल्या लवादाच्या समितीने सीलबंद लिफाफ्यात अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. आता संपूर्ण देश न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे खंडपीठ सुनावणी घेईल. या खटल्याची सुनावणी पूर्ण करणारे पाच न्यायाधीश कोण आहेत, जे या प्रकरणी ऐतिहासिक निकाल देणार आहेत. आज आम्ही तुम्हाला त्यांची माहिती सांगणार आहोत.


न्यायमूर्ती रंजन गोगोई, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई हे अयोध्या प्रकरणाच्या सुनावणी पीठाचे अध्यक्ष आहेत. न्यायमूर्ती रंजन गोगोई यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1954 रोजी झाला होता. ते देशाचे 46 वे सीजेआय आहेत. 1978 मध्ये त्यांनी बार कौन्सिलमध्ये प्रवेश केला. न्यायमूर्ती गोगोई यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात गुवाहाटी उच्च न्यायालयात केली. 2001 मध्ये तेथे न्यायाधीश होते. २०१० मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. त्यानंतर 23 एप्रिल 2012 रोजी, त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले. 3 ऑक्टोबर 2018 रोजी ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत या पदावरून निवृत्त होतील. अयोध्या प्रकरणा व्यतिरिक्त त्यांनी एआरसी आणि जम्मू-काश्मीर प्रकरण सारख्या अनेक ऐतिहासिक खटल्यांची सुनावणी केली आहे.

न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड
11 नोव्हेंबर 1959 रोजी जन्मलेल्या न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (सीजेआय) होते. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड यांनी दिल्ली विद्यापीठातील सेंट स्टीफन्स कॉलेज आणि त्यानंतर हॉवर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. जगातील अनेक मोठ्या विद्यापीठांमध्ये ते व्याख्यातेही राहिले आहेत. सुरुवातीला त्यांनी कनिष्ठ वकील म्हणून काही दिवस काम केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आधी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. 13 मे 2016 रोजी, त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले. न्यायाधीश म्हणून नेमलेले ते देशातील पहिले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आहेत. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी सबरीमाला, समलैंगिकतेसह अनेक बड्या खटल्यांची सुनावणी केली आहे.

न्यायमूर्ती अशोक भूषण
न्यायमूर्ती अशोक भूषण यांचा जन्म 5 जुलै 1956 रोजी उत्तर प्रदेशच्या जौनपुर येथे झाला. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून शिक्षण घेतले. 1979साली ते उत्तर प्रदेश बार कौन्सिल सामील झाले. अलाहाबाद उच्च न्यायालयात सराव केला आहे. 2001 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. 2014 मध्ये केरळ हायकोर्टाचे न्यायाधीश झाले आणि त्यानंतर एका वर्षानंतर मुख्य न्यायाधीशही झाले. 13 मे 2016 रोजी न्यायमूर्ती अशोक भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले.

न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर
न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांचा जन्म कर्नाटकातील बेलुवाई या गावी 5 जानेवारी 1958 रोजी झाला होता. त्याचबरोबर महावीर कॉलेजमधून बी.कॉम पदवी घेतली. त्यानंतर मंगलोरच्या एसडीएम लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतले. न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांनी 1983 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयातून कायदेशीर सराव सुरू केला. नंतर ते अतिरिक्त न्यायाधीश आणि त्यानंतर न्यायाधीश झाले. 17 फेब्रुवारी 2017 रोजी, त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले. न्यायमूर्ती अब्दुल नजीर हे देशातील तिसरे न्यायाधीश आहेत, ज्यांना कोणत्याही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न बनता सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्त केले गेले होते.

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे
न्यायमूर्ती शरद अवरिंद बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी नागपूर, महाराष्ट्रात झाला. 1978 मध्ये ते महाराष्ट्र बार कौन्सिलमध्ये दाखल झाले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात कायद्याचा सराव केला. सन 2000 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून काम पाहिले. त्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक केली. 2013 मध्ये न्यायमूर्ती बोबडे यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले. 23 एप्रिल 2021 रोजी ते निवृत्त होतील.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top