Monday, 22 Jul, 8.36 am माझा पेपर

होम
किम जोंग उन जवळपास 100 टक्के मतांनी विजयी

उत्तर कोरियामध्ये रविवारी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तानाशाह किम जोंग उनला जवळजवळ 100 टक्के मते मिळाली आहेत. पर्यवेक्षकांचे म्हणणे आहे की, निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारच नसल्याने देशातील निवडणुका या केवळ राजकीय दिखावेगिरी आहे.

या निवडणुकीच्या निकालानंतर लोक किम जोंग उन यांच्यावर किती विश्वास ठेवतात हेच दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. या निवडणुकीत 99.98 टक्के मतदान झाले. 2015 च्या तुलनेत ही टक्केवारी 0.01 टक्के जास्त आहे.

उत्तर कोरियाची सरकारी एजेंसीने रविवारी सांगितले की, जे लोक परदेश दौरे अथवा समुद्री यात्रेवर आहेत केवळ त्यांनीच मतदान केले नाही. आजारी व वृध्द लोकांनी मोबाईल मतदान केंद्रांवर मतदान केले.

उत्तर कोरियामध्ये दर 4 वर्षांनी प्रांतीय, शहर आणि जिल्हा मतदारसंघाच्या प्रतिनिधींच्या निवडीसाठी मतदान होते. तसेच किम जोग उन यांनी हाम्गयोंग राज्यात दोन उम्मेदवार जू सोंग हो आणि जोंग सोंग सिक यांना मतदान केले. दोघेही जिल्हा मतदारसंघासाठी निवडणूक लढवत होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top