Sunday, 07 Jun, 3.04 pm माझा पेपर

होम
लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचा समावेश; फडणवीस म्हणाले.

मुंबई लोकप्रिय मुख्यमंत्र्यांबाबत एक देशपातळीवर आयएनएस आणि सी-व्होटर्सने सर्वेक्षण केले होते. त्यानुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील या लोकप्रिय 5 मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य करताना खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

हे सर्वेक्षण कोणाचे आहे, ते मला माहिती नाही. त्याचबरोबर हे सर्वेक्षण मी बघितलेले नाही. ते कोणाला लोकप्रिय वाटत असतील, तर ते चांगलेच आहे. पण आता एवढीच अपेक्षा आहे, की कोरोनाच्या संकट काळात महाराष्ट्र सरकारने चांगले काम केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांच्या कामाने दिलासा मिळाला पाहिजे. मुंबईतील लोकांची आजची अवस्था अत्यंत गंभीर आहे. सोशल मीडियावर जाऊन आपण मुंबईची अवस्था जर बघितली, तर कोणाची लोकप्रियता किती आहे, हे आपल्या लक्षात येईल, अशी टोलेबाजी करताना माझ्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पुन:श्च हरी ओम ही उद्धव ठाकरे यांची संकल्पना चांगलीच आहे. सगळ्या राज्यांना सुरुवात करावी लागेलच. जमिनीवर वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळाला पाहिजे. खुल्या दिलाने पुन:श्च हरी ओम करावे लागेल, तरच उद्योग सुरू होतील, असे फडणवीस म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>