Wednesday, 05 Aug, 10.15 am माझा पेपर

होम
फाइल शेअरिंगसाठी गुगलने केली Nearby Share फीचरची अधिकृत घोषणा

अखेर गुगलने अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अँड्रॉइड युझर्ससाठी Nearby Share फीचरची अधिकृत घोषणा केली असून कंपनीने हे फीचर अँड्रॉइड 6.0 किंवा त्यापेक्षा वरच्या व्हर्जनसाठी रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. काही गुगल पिक्सेल आणि सॅमसंगच्या डिव्हाइसेसवर सुरूवातीला हे फीचर उपलब्ध होईल. त्यानंतर काही दिवसांमध्ये सर्व युजर्ससाठी हे फीचर रोलआउट केले जाईल. मोठ्या साइजच्या फाइल्सही याद्वारे काही सेकंदांमध्ये दुसऱ्या फोनमध्ये ट्रांसफर करता येणे आता शक्य होणार आहे.

अ‍ॅपलच्या AirDrop फीचरप्रमाणे गुगलचे हे नवे फीचर काम करते. अँड्राइड युजर्स याद्वारे एका डिव्हाइसमधून अन्य डिव्हाइसमध्ये जलदगतीने फाइल्स पाठवू शकतील. हे एक इनबिल्ट फीचर असल्यामुळे कोणते अ‍ॅप डाउनलोड करावे लागत नाही. याद्वारे फाइल्स, फोटो, व्हिडिओ, आणि लिंक्स शेअर करता येतात. अँड्रॉइड 6.0 किंवा त्यापेक्षा वरच्या व्हर्जनच्या सर्व अँड्रॉइड फोनवर हे फीचर काम करेल. प्रायव्हसी सुरक्षेसाठी सेंडर आणि रिसिव्हरची माहिती पूर्णपणे एनक्रिप्टेड असेल. तुमचा डिव्हाइस इतरांना व्हिजिबल असावा की नाही याचा पर्यायही यामध्ये देण्यात आला आहे.

अनेक युजर्स आतापर्यंत ShareIt किंवा Xender या अ‍ॅप्सचा स्मार्टफोन्समधील मोठ्या साइजच्या फाइल्स शेअर करण्यासाठी वापर करत होते. पण भारताने नुकतेच ५९ चिनी अ‍ॅप्स बॅने केले, ShareIt आणि Xender चाही त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे युजर्स सध्या अशा फाइल्स ट्रांसफर करण्यासाठी दुसऱ्या अ‍ॅपच्या शोधात आहेत. आता गुगलच्या Nearby Share फीचरमुळे अशा युजर्सना दिलासा मिळणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top