Sunday, 22 Sep, 6.04 am माझा पेपर

होम
पीओकेसाठी नेहरू जबाबदार - अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एकदा माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला आहे. पाकव्याप्त काश्मीरला जवाहरलाल नेहरू यांना दोषी ठरवत अमित शाह म्हणाले की, जर त्यांनी त्यावेळी युध्द थांबवण्याचा निर्णय घेतला नसता तर पीओके निर्माण झाले नसते. महाराष्ट्रीतल विधानसभेच्या निमित्ताने सभेत बोलत होते.

अमित शाह म्हणाले की, जर युध्द थांबवलेच नसते तर पीओके निर्माणच झाले नसते. जवाहरलाल नेहरू यांच्या ऐवजी सरदार पटेल यांनी काश्मीर मुद्दा सोडवायला हवा होता.

याचबरोबर काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर एकदाही बंदुकीचा वापर करण्यात आला नसल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, राहुल गांधी आणि शरद पवार यांनी कलम 370 बद्दलची आपली भूमिका स्पष्ट करावी. याचबरोबर देवेंद्र फडवणीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील असा विश्वास देखील शाह त्यांनी यावेळी वर्तवला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top