Saturday, 14 Dec, 9.04 pm माझा पेपर

होम
रेल्वे स्टेशनवर 5 रुपयात विकले जात आहे हवेपासून बनवलेले पाणी

(Source)

तेलंगणाच्या सिंकदराबाद रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर हवेपासून बनवण्यात आलेल्या पाण्याची विक्री होते. बाटलीतसह या पाण्याची 8 रुपयांना विक्री केली जाते. ग्राहक स्वतःच्या बाटलीत 5 रुपयांमध्ये हे पाणी खरेदी करू शकतात. जल उर्जा मंत्रालयाने या पाण्याला आरोग्यासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर साउथ सेंट्रल रेल्वेने येथे गुरूवारी कियोस्क इंस्टॉल केले. याचे ऑटोमेटिक वॉटर जनरेटर दररोज 1000 लीटर पाणी तयार करते, जे स्टीलच्या टँकमध्ये जमा होते.

हा टँक पाण्याला खराब करत नाही व पाण्याला नेहमी ताजे ठेवते. हवेपासून पाणी तयार करण्याच्या मेघदूत नावाच्या तंत्राला मैत्री एक्वाटेकने मेक इन इंडिया अंतर्गत तयार केले आहे.

साउथ सेंट्रल रेल्वे (एससीआर) अधिकाऱ्यांनुसार, मशीन पर्यावरणाला अनुकूल आहे. हे कोणत्याही पाण्याच्या स्त्रोतावर अंवलंबून नाही. ही मशीन प्रत्येक वातावरणात काम करते. याचा आवाज देखील येत नाही. मशीन हवेतून थेट पाणी शोषून घेते आणि अनेक टप्प्यातून गेल्यावर पाणी जमा होते.

असे तयार होते पाणी -

सर्वात प्रथम हवेचा प्रवाह मशीनमधून जातो. जेथे त्यातील डस्ट पार्टिकलसोबत इतर प्रदुषित तत्व शोषून घेतले जातात. मशीनमधून निघणारी हवा थेट कूलिंग चेंबरमध्ये जाते, जेथे त्याला थंड केले जाते. हेच पाण्यात रुपांतर होते व त्याचे थेंब-थेंब जमा होते.

जमा झालेले पाणी देखील अनेक स्तरातून फिल्टर होते. यामुळे पाण्यातील प्रदुषित तत्व नाहीसे होतात आणि पाणी शुद्ध होते. या पाण्याला देखील अल्ट्रा वॉयलेट किरणांमधून जावे लागते. त्यानंतर हे पाणी पिण्यायोग्य होते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top