Friday, 24 Sep, 12.44 pm माझा पेपर

होम
शाहरुखची इंडिअन साईन लँग्वेज डिक्शनरीत एन्ट्री

बॉलीवूड किंग खान शाहरुख सध्या चित्रपटांपासून थोडा दूर असला तरी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने चर्चेत असतो. यावेळी तो इंडिअन साईन लँग्वेज डिक्शनरीत झालेल्या त्याच्या एन्ट्रीमुळे चर्चेत आला आहे. याच महिन्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ही डिक्शनरी लाँच केली गेली आहे.

दरवर्षी २३ सप्टेंबर हा दिवस 'इंटरनॅशनल साईन लँग्वेज डे' म्हणून साजरा होतो. बोलू आणि ऐकू न शकणाऱ्या दिव्यांगाना मदत म्हणून मोदी यांनी सप्टेंबर मध्ये इंडिअन साईन लँग्वेज डिक्शनरी लाँच केली आहे. भारतीय संकेतिक भाषा कोशात १० हजार शब्द असून त्यात आता शाहरुखची भर पडली आहे. शाहरुख हे साईन लँग्वेज मध्ये सांगताना सरळ हात ठेऊन बोटे गन प्रमाणे पॉइंट करायची आणि हृदयावर दोन वेळा टॅप करायचे आहे.

या संदर्भातला एक व्हिज्युअल इंडिअन साईन लँग्वेज व प्रशिक्षण सेंटरने जारी केला असून ट्विटरवर त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शाहरुख चा झिरो हा चित्रपट यशस्वी ठरला नाही आणि सध्या त्याने दीर्घ ब्रेक घेतला आहे. पण लवकरच तो पठाण मध्ये दिसणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top