Thursday, 22 Apr, 11.04 am माझा पेपर

होम
टाटा समूह परदेशातून आयात करणार २४ मोठे ऑक्सिजन कंटेनर

नवी दिल्ली - देशात मंगळवारी दोन लाख ९४ हजार कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आरोग्य सुविधांची कमतरता अनेक ठिकाणी जाणवू लागली आहे. रेमडेसिवीर तसेच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर टाटा उद्योग समुहाने दोन दिवसांपूर्वीच पुढाकार घेत २००-३०० टन ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. पण पंतप्रधान मोदींनी मंगळवारी केलेल्या आवाहनानंतर आता टाटा ग्रुपने थेट परदेशातून भारतीयांसाठी सुविधा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या आकाराचे २४ ऑक्सिजन वाहक सिलेंडर्स आयात करण्याचा निर्णय टाटा समूहाने घेतला असून यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे.

देशातील सर्व नागरिकांना केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन कौतुकास्पद आहे. टाटा कंपनीकडून भारतातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आम्ही जे शक्य आहेत ते सर्व प्रयत्न करण्यास कटीबद्ध आहोत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आम्ही असाच एक निर्णय घेतला असल्याचे ट्विट टाटा ग्रुपच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आले आहे.

द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजनची देशभरामध्ये वाहतूक करण्यासाठी टाटा ग्रुपने २४ मोठे कंटेनर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या देश कोरोनाविरोधात देत असलेल्या लढ्यामध्ये आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याचा आमचा हा प्रयत्न असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top