Friday, 11 Jun, 12.20 pm माझा पेपर

होम
तिबेटी बौद्ध भिक्षुकडून रशियन वैज्ञानिक घेताहेत समाधीचे धडे

मंगळावर मानवी वसाहत उभारण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहेच पण मंगळावर पहिला मानव पाठविण्यासाठी रशिया सुद्धा जोरदार तयारी करत आहे. विशेष म्हणजे रशियन अंतराळ वैज्ञानिक आजकाल तिबेटी बौद्ध भिक्षुना शरण गेले असून त्यांच्याकडून समाधी अवस्थेचे धडे गिरवीत आहेत असे समजते.

बौद्ध भिक्षु आठवडेच्या आठवडे अन्न पाणी न घेता समाधी अवस्थेत राहतात आणि समाधी अवस्थेतून बाहेर आल्यावर नेहमीचे त्यांचे आयुष्य सुरु होते हे आता सिद्ध झाले आहे. मास्को स्टेट युनिव्हर्सिटीने १०० बौद्ध भिक्कू ध्यान धारणा, समाधी यांचे शिक्षण देण्यासाठी निवडले असून त्याच्याकडून ही पद्धत जाणून घेतली जात आहे.

दीर्घ अंतराचे स्पेस मिशन आणि मंगळ ५०० अभियानचे नेतृत्व करणारे प्रो. युरी बबयेव या संदर्भात म्हणाले, बौद्ध भिक्कू शीतनिद्रा घेतात, ही स्थिती मंगळ मिशन साठी अत्यंत महत्वपूर्ण ठरू शकते. समाधी अवस्था यावरही अध्ययन केले जात आहे. डॉक्टरने एखाद्या साधकाला मृत घोषित केले असले तरी आठवडेच्या आठवडे या अवस्थेतील भिक्कू ताठ बसू शकतात. प्रेताला येणारी दुर्गंधी त्यांच्या शरीराला येत नाही. अथवा मृत झाल्याची अन्य लक्षणे त्यांच्यात दिसत नाहीत. ही गहन एकाग्रता अवस्था म्हणता येते.

गहन एकाग्रता अवस्थेत चयापचय गती मध्ये बदल होतो. अनेक तास, दिवस या अवस्थेत राहण्यासाठी ध्यान, एकांत आणि मंत्रोच्चार यांचा अभ्यास करावा लागतो. तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या परवानगीनेच हे अध्ययन केले जात असल्याचे बबयेव यांनी स्पष्ट केले. ही अवस्था गाठता आली तर शरीराला जास्त नुकसान न होता अंतराळ प्रवासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल असा विश्वास हे वैज्ञानिक व्यक्त करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top