Thursday, 27 Feb, 11.12 am माझा पेपर

होम
टोयोटाची 80 लाखांची एमपीव्ही भारतात लाँच

टोयोटाने भारतीय बाजारात आपली लग्झरी एमपीव्ही (मल्टी पर्पज व्हिकल) वेलफायर (Vellfire) लाँच केली आहे. टोयोटा वेलफायर एमपीव्हीची किंमत 79.50 लाख रुपये आहे. ही एमपीव्ही पेट्रोल हायब्रिड इंजिनमध्ये येईल.

टोयोटा वेलफायरमध्ये 2.5 लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 4700 rpm वर 87 bhp पॉवर आणि 2800 ते 4000 rpm वर 198 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 105kW आणि 50kW च्या दोन इलेक्ट्रिक मोटार देण्यात आलेल्या आहेत. इलेक्ट्रिक आणि पेट्रोल इंजिनचा एकत्र पॉवर आउटपुट 196 bhp आहे. हे हायब्रिड इंजिन ई-सीव्हीटी गिअरबॉक्सने सुसज्ज आहे.

Image Credited - navbharattimes

वेलफायर टोयोटाची फ्लॅगशिप एमपीव्ही आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची आधीपासूनच विक्री केली जात आहे. यात तीन रांगेत सीट्स देण्यात आलेले आहेत. दुसऱ्या रांगेत रेक्लाइनिंग फंक्शन आणि इलेक्ट्रॉनिक फुटरेस्टसोबत दोन कॅप्टन सीट्स आहेत. हे सीट्स वेंटिलेटड आहे. या सीट्सला एक फ्लॅट-बेडप्रमाणे बनवता येते.

Image Credited - navbharattimes

या एमपीव्हीच्या तिसऱ्या रांगेत बसणाऱ्यांसाठी रुफ माउंडेट 13 इंच रिअर एंटरटेनमेंट स्क्रीन देण्यात आली आहे. यासोबतच 17-स्पीकर जेबीएल साउंड सिस्टम, ड्यूअल सनरूफ, रूफ लायटिंगसाठी16 रंगाचे पर्याय आणि 3-झोन ऑटो क्लायमेट कंट्रोलसारखे फीचर्स आहेत. यामध्ये आत फोल्ड होणारे टेबल आणि कपहोल्डर देखील आहेत.

Image Credited - ZigWheels

वेलफायर एमपीव्हीची लांबी 4935mm, रुंदी 1850mm आणि उंची 1895mm आहे. याचे व्हिलबेस 3000mm आहे. ज्यामुळे यात अधिक जागा मिळते.

टोयोटाच्या या लग्झरी एमपीव्हीमध्ये कॉर्नरिंग फंक्शनसोबत एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेललाइट्स आणि क्रोम फिनिश 17-इंच एलॉय व्हिल्ज देण्यात आलेले आहेत. यात इलेक्ट्रिक स्लायडिंग दरवाजे आहे. सुरक्षेसाठी यात 7-एअरबॅग्स, एबीएस, ईबीडी, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, पॅनोरमिक व्ह्यू मॉनिटर आणि पार्किंग असिस्ट सारखे फीचर्स मिळतील.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top