Saturday, 28 Dec, 12.52 pm माझा पेपर

होम
उद्धव ठाकरेंबाबत वर्षा बंगल्यांच्या भिंतींवर आक्षेपार्ह लिखाण!

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेल्यामुळे आपली खंत व्यक्त केली आहे. आता सध्या सोशल मीडियावर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. वर्षा बंगल्यांच्या भितींचीही आता त्यात भर पडली आहे. फडणवीस यांची लहान मुलगी दिवीजा राहत असलेल्या खोलीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये आक्षेपार्ह लिहिल्याची माहिती समोर आली आहे.

फडणवीस कुटुंबाला राज्याचे मुख्यमंत्री पद गेल्यामुळे वर्षा बंगला सोडावा लागला होता. फडणवीस यांनी वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडताना दिरंगाई केली होती. त्यानंतर हा बंगला नवीन मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे यांना राहण्यासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. पण या बंगल्याची त्यापूर्वी पाहणी केली असता काहींना वर्षा बंगल्याच्या भिंतीवर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याचे आढळले आहे.

दिविजा फडणवीस राहत असलेल्या खोलीच्या भिंतीवर Who is UT? UT Is mean? Shut Up अशी वाक्य लिहिण्यात आली आहे. Who is UT? युटी कोण आहेत, UT Is mean? युटी वाईट आहेत असे वर्षा बंगल्याच्या भितींवर लिहिले आहे. BJP is rock, Bjp and shivsena were friend, Fadnavis rock असेही या भितींवर लिहिले आहे.

अशाप्रकारचा मजकूर दिविजा राहत असलेल्या खोलीमधील सर्वच भिंतीवर लिहिला आहे. अशाप्रकारे भिंतीवर लिहिलेल्या या वाक्यांमुळे फडणवीस कुटुंब उद्धव ठाकरेंचा किती द्वेष करु लागलेत हे दिसून येत आहेत.

उद्धव ठाकरे यांना तुम्ही वर्षावर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहायला जाणार का?" असा प्रश्न काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेदरम्यान विचारला होता. या प्रश्नाचे अत्यंत हसतखेळत उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. वर्षावर मी फक्त कामासाठी जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मी मातोश्रीबद्दल काही वेगळे सांगणार नाही. मातोश्रीचे महत्त्व काही वेगळे आहे. पण एखादी जबाबदारी घेतल्यानंतर ती पार पाडण्यासाठी जे गरजेचे असते म्हणजेच जनतेला भेटणे किंवा इतर ज्या काही गोष्टी त्या मी करणार असल्यामुळे वर्षावर जेव्हा जेव्हा कामासाठी जाणे गरजेचे आहे. तेव्हा मी तिथे जाणार असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top