Wednesday, 05 Aug, 3.36 pm माझा पेपर

होम
Whatsapp web युझर्ससाठी आले 'Messenger Rooms' फीचर

आपल्या युझर्ससाठी दरवेळेस फेसबुक ही सोशल मीडियातील अग्रगण्य कंपनी नव-नवीन फीचर लाँच करत असते. त्यानुसार यावेळी कंपनीने आपल्या युझर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप वेबवर फेसबुक मेसेंजर रुम्स फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून आता युजर्स व्हॉट्सअ‍ॅपवर एकाचवेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल करू शकतील. विशेष म्हणजे, यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही, म्हणजेच युजर्स त्यांना हव्या तितक्या व्यक्तींना व्हिडिओ कॉल करू शकतात.

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर हे फीचर नुकतेच लाँच करण्यात आले असून ते फक्त डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर वापरले जाऊ शकते. तसेच, हे फीचर स्मार्टफोनवर केव्हा आणले जाईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. काही महिन्यांपूर्वी फेसबुक मेसेंजरवर ग्रुप व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी फेसबुक मेसेंजर रुम्स फीचर सुरू करण्यात आले होते.

'या' फीचरचा वापर करण्याच्या काही टीप्स

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top