Friday, 24 Sep, 12.36 pm माझा पेपर

होम
येमेन मधील नरकाच्या खड्यात उतरले वैज्ञानिक

येमेन देशातील बरहून मधील एक महाप्रचंड विवर' वेल ऑफ हेल' म्हणजे नरकाची विहीर म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. या खड्यात सैतानांना कैद केले जाते आणि या अतिखोल खड्ड्यात जिन, भुते राहतात असे सांगितले जाते. स्थानिक लोक या रहस्यमय खड्ड्याविषयी नुसते बोलायला सुद्धा तयार नसतात. विशाल वाळवंटात हा खड्डा आहे. दीर्घ काळ या खड्ड्यात काय असावे याचे गुढ आहे.

या खड्यात ओमानच्या जर्मन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीच्या भूगर्भ शास्त्र विभागाचे प्रोफेसर मोहम्मद अल किंदी यांच्यासह आठ वैज्ञानिकांची टीम उतरली आहे. या खड्ड्यात नक्की काय आहे याचा शोध त्यांनी घेतला. ओमान केव्ह एक्स्प्लोरेशन टीम आत उतरली तेव्हा त्यांना साप, काही मेलेले प्राणी अवशेष आणि पाण्यामुळे तयार होणारे, गुहेत बनणारे मोती मिळाले असे समजते. हा खड्डा ३० मीटर रुंद आणि १०० ते २५० मीटर खोल असावा असा अंदाज आहे.

खड्ड्याच्या तळापर्यंत प्रकाश पोहोचत नाही. प्रो.मोहम्मद म्हणाले आत साप आहेत पण तुम्ही त्यांना त्रास दिला नाही तर ते इजा करत नाहीत. आत मध्ये काहीही अनैसर्गिक प्रकार नाही. भिंतीवर अद्भूत रचना तयार झालेल्या आहेत आणि राखाडी, हिरव्या रंगाचे मोती दिसत आहेत.

महारा जिओलॉजीकल सर्व्हेचे महासंचालक सालाह म्हणाले, आत मध्ये ऑक्सिजन प्रमाण कमी आहे. त्यांना ५० मीटर खोलीपर्यंत जाता आले होते. आत विशिष्ट वास आहे. हा खड्डा लाखो वर्षापूर्वीचा असून त्यावर अधिक संशोधन होणे आवश्यक आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Paper
Top