Monday, 16 Oct, 2.02 am माझा विदर्भ

होम पेज
दिवाळीतील 'अभ्यंग स्नान' करायची पद्धत आणि फायदे.| Diwali- Abhyang Snan Benefits

अभ्यंग स्नान

दिवाळीतील नरक चतुर्दशीच्या दिवशी भल्या पहाटेचे स्नान शुभ मानल्या जाते. अशी मान्यता आहे कि सूर्योदयाच्या आधी स्नान करणे म्हणजेच गंगे मध्ये स्नान करने, हे स्नान गंगा नदीत केलेल्या अंघोळीइतकेच पुण्य आपल्याला मिळवून देते.

या प्रकारे करावे अभ्यंगस्नान:

  • आपल्या शरीराची तिळाच्या तेलाने मालिश करावी.
  • मालिश केल्यानंतर व अभ्यंग स्नान करण्यापूर्वी ३० मिनिटांकरिता वाट पहावी. यामुळे तेल आपल्या शरीरात संपूर्ण जिरून जाईल.
  • स्नानाच्या वेळी आपल्या पूर्ण शरीरावर उटणे लावून चांगल्याप्रकारे घासून घ्यावे.
  • उटणे वाळल्यानंतर पाण्याच्या सहाय्याने ते काढून घ्यावे.
  • भरपूर लोक उटणे लावल्यानंतर साबणाचा वापर करत नाही, परंतु आपल्याला हवे असेल तर आपण साबणाचा वापर करू शकता.

सुगंधी उटणे:

दिवाळी मध्ये उटण्याचे महत्व खूप जास्त आहे. उटण्याने आपली शरीराची कांती उजळून छान दिसते, तसेच त्वचा मुलायम देखील राहते. आपला चेहरा स्वच्छ होतो, अंगाला चांगला सुगंध येतो, शरीराची मृत त्वचा ताजी होते.

घरगुती उटणे बनवण्याची कृती:

२५० ग्राम -मसूर डाळ
२५ ग्राम- सरिवा
२५ ग्राम- वाळा
२५ ग्राम - नागर मोथा
२५ ग्राम -जेष्ठमध
२५ ग्राम -सुगंधी कचोरा
२५ ग्राम -आंबेहळद
२५ ग्राम -तुलसी पावडर
२५ ग्राम -मजीस्ट
५ ग्राम -कापूर

या संपूर्ण सामग्रीला एकत्र करून तुम्ही घरगुती सुगंधी उटणे तयार करू शकता.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Majha Vidarbha
Top