भारताची अर्थव्यवस्था रुळावर येत आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : परकीय गुंतवणुकात १३टक्के वाढ झाली असून भारत अजूनही २०२४ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठू शकतो असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक सुधारणा सुरूच राहतील पण राज्यांनीही गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करावे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

कोरोना व्हायरस संकटात किती जीव वाचवण्यात आपण यशस्वी ठरलो, यावर मोहिमेचं यशापयश मोजले जावे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

