Dailyhunt
खळबळजनक! मंगळवेढा बसस्थानकावरून २५ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; आई, तुम्ही गाडीत बसा, मी येते.असं म्हणाली अन् तरुणी गायब

खळबळजनक! मंगळवेढा बसस्थानकावरून २५ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; आई, तुम्ही गाडीत बसा, मी येते.असं म्हणाली अन् तरुणी गायब

टीम ​मंगळवेढा टाईम्स।

मंगळवेढा बसस्थानकावर प्रवाशांची मोठी वर्दळ असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

आपल्या आईसोबत माहेरला निघालेली एक २५ वर्षीय विवाहित तरुणी 'आई, तुम्ही एसटीत बसा, मी पाठीमागून येते' असे सांगून अचानक बेपत्ता झाली आहे.

याप्रकरणी तिच्या ५० वर्षीय आईने मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या तरुणीचा कसून शोध घेत आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १६ एप्रिल रोजी दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास घडली. ही तरुणी आपल्या आईसोबत बसस्थानकावर होती.

गाडी सुटण्याच्या तयारीत असताना तिने आईला गाडीत बसण्यास सांगितले आणि स्वतः काही कारणास्तव मागे थांबली.

मात्र, बराच वेळ झाला तरी ती गाडीत आली नाही आणि घरीही परतली नाही. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु तिचा पत्ता न लागल्याने अखेर पोलिसांत धाव घेण्यात आली.

​बेपत्ता तरुणीचे वर्णन:

​प्रशासनाने नागरिकांना खालील वर्णनाची तरुणी आढळल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे:
​वय: २५ वर्षे (विवाहित), ​उंची: १५७ सें.मी., ​रंग: सावळा, ​बांधा: सडपातळ, ​शिक्षण: ९ वी, ​पेहराव: बेपत्ता झाली तेव्हा अंगात 'अंबा' रंगाची साडी आणि ब्लाऊज होता.

येथे साधा संपर्क:

​जर कोणाला ही तरुणी कोठे दिसून आली किंवा तिच्याबद्दल काही माहिती मिळाली, तर त्वरित खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
📞 महिला पोलीस हवालदार सुनिता चवरे: ९८५०१६१८७८

​मंगळवेढा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवेढा शहर परिसरातून एक व्यक्ती गायब झाल्याची कुटूंबियाची पोलीसात तक्रार

मंगळवेढा शहरातील पंढरपूर मार्गावरुन एक ३९ वर्षीय व्यक्ती राहत्या घरातून बाहेर जावून येतो सांगून बाहेर पडल्याने गायब झाली असल्याची तक्रार त्याच्या कुटूंबियाच्या तक्रारीवरुन पोलीसात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद झाली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता खबर देणारे यशोदा जावीर यांच्या गणपती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या घरातून

39 वर्षीय इसम बाहेर जावून येतो असे सांगून गेला तो अदद्यापपर्यंत घरी आलेला नाही. सर्वत्र शोध घेवून तो मिळून आला नसल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

त्याचे वर्णन पुढील प्रमाणे उंची ५ फुट ७ इंच, रंग निमगोरा, अंगात नेसणेस निळ्या रंगाचा शर्ट, निळी जीन पँट अशा वर्णनाची व्यक्ती कोणाच्या निदर्शना आल्यास महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ. आरती कणिरे (९३२५४७८१११) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कचरेवाडी येथे उसणे दिलेले पैसे मागीतल्याच्या कारणावरुन एकास लोखंडी गजाने मारुन केले गंभीर जखमी; चौघा विरुध्द गुन्हा दाखल…..

मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथे उसने दिलेले पैसे मागीतल्याच्या कारणावरुन एका ३५ वर्षीय तरुणास लोखंडी गजाने मारुन गंभीर जखमी केल्या प्रकरणी रघुनाथ भोसले, रेश्मा भोसले, किसन नारायण इंगोले, गंगाबाई नारायण इंगोले (जित्ती) या चौघा विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी आनंदा भोसले (रा.कचरेवाडी) यांच्या घरी वरील चौघे आरोपी आले होते. फिर्यादी यांनी त्यांना उसने दिलेले पैसे मागीतले असता आरोपींनी संगनमत करुन आम्हाला तुझे पैसे वगैरे काही माहित नाही,

आम्ही तुला पैसे देणार नाही असे म्हणून शिवीगाळी करीत लोखंडी गजाने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या कोपरा जवळ व मानेवर केबलने मारुन गंभीर जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Mangalwedha Times