Sunday, 25 Oct, 7.17 pm मंगळवेढा Times

होम
कोरोना ब्रेकिंग! कारखान्याच्या संचालकासह कार्यकारी संचालक व महाविद्यालयाचे प्राचार्य पॉझिटिव्ह

सोलापूर जिल्ह्यात कोरोना कहर हळूहळू कमी होताना दिसत असतानाच विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात कोरोनाने प्रवेश केला असुन कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, कार्यकारी संचालक बोरावके वर्क्स मॅनेजर जाधव यांच्यासह इतर 5 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

तर श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.बी.पी रोंगे हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.यामुळे तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव ओसरत असतानाच पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा रविवारी गाळप हंगाम सुरू झाला. मात्र या कार्यक्रमावर कोरोनाचा प्रभाव दिसून आला. कारण एकाच वेळी कारखान्याच्या कार्यकारी संचालक, वर्क्स मॅनेजर सह संचालक भगीरथ भालके हेसुद्धा पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

भगीरथ भालके , कार्यकारी संचालक बोरावके यांना सौम्य लक्षणे असली तरीही रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.

दरम्यान विठ्ठल अभियंत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी रोंगे हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यांनी यासंदर्भात फेसबुकवर पोस्ट करून माहिती दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात अलेल्या लोकांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Mangalwedha Times
Top